Headlines

Strong comeback of the rally in Thursday’s session.


सेन्सेक्स 238 अंकांनी मजबूत : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामगिरीचा प्रभाव

वृत्तसंस्था/मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी बुधवारच्या मोठ्या घसरणीनंतर तेजी प्राप्त केली आहे. दरम्यान प्रमुख कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात तेजीचे जोरदार पुनरागमन झाले आहे.  दिवसभर मर्यादित कक्षेत व्यवहार होऊनही, शेवटच्या काही तासांत वाढलेल्या खरेदीमुळे प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. रिअल्टी, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली, तर आयटी क्षेत्र दबावाखाली राहिले. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 238.22 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.31 टक्क्यांनी वाढून 76,741.82 वर बंद झाला.

त्याचवेळी, एनएसईचा निफ्टी 80.75 अंकांनी वाढून 23,962.80 वर बंद झाला. या शेअर्सनी बाजारात सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह आणि भारती एअरटेल हे निफ्टीमधील सर्वाधिक वाढ झालेल्या शेअर्सपैकी होते. या शेअर्समधील खरेदीमुळे बाजार मजबूत झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये शानदार तेजी प्रमुख निर्देशांकांसोबतच, व्यापक बाजारातही चांगली तेजी दिसून आली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 1.38 टक्क्यांच्या वाढीसह आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 1.80 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

रिअल्टी क्षेत्रात सर्वाधिक वाढ, आयटी क्षेत्रात घसरण

क्षेत्रीय निर्देशांकामध्ये निफ्टी रिअल्टी हे सर्वाधिक वाढ झालेले क्षेत्र ठरले आहे. याशिवाय, निफ्टी मीडिया, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स आणि निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकातही चांगली वाढ दिसून आली. त्याच वेळी, निफ्टी आयटी निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली, ज्यामुळे टेक स्टॉक्सवर दबाव आला. ग्लोब कॅपिटल मार्केट्स लिमिटेडचे एव्हीपी रिसर्च, विपिन कुमार यांच्या मते, बाजाराची सुरुवात गॅप-अपने झाली, परंतु त्यानंतर दिवसभर निफ्टी मर्यादित कक्षेतच व्यवहार करत राहिला. त्यांनी सांगितले की, निफ्टी सध्या त्याच्या 100-दिवसांच्या आणि 200-दिवसांच्या एक्सपोनेंशियल मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली व्यवहार करत आहे. अलीकडच्या काळात, पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक वित्तीय बाजारांसाठी चिंता वाढली आहे. दरम्यान, कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शाह म्हणतात की, सध्याची भू-राजकीय परिस्थिती पाहता, गुंतवणूकदारांनी भविष्यातील परताव्याच्या अपेक्षांमध्ये संतुलन राखले पाहिजे.

  • सनफार्मा 1940
  • भारती एअरटेल 1935
  • बजाज फिनसर्व्ह 1899
  • इंडिगो 5230
  • इटर्नल 292
  • कोटक बँक 377
  • ग्रासिम 3196
  • श्रीराम फायनान्स 1033
  • एसबीआय लाइफ 1823
  • अल्ट्राटेक सिमेंट 11563
  • जियो फाय. 233
  • मॅक्स हेल्थकेअर 1100
  • टाटा कंझ्यु. 1104
  • अदानी एंटरप्रायझेस 3077
  • नेस्ले 1464
  • अपोलो हॉस्पिटल 8830
  • एचडीएफसी बँक 817
  • सिप्ला 1443
  • अदानी पोर्टस 1802
  • एसबीआय 1022

  • डॉ. रेड्डिज लॅब्ज 1271
  • मारुती सुझुकी 13709
  • ओएनजीसी 243
  • इन्फोसिस 1055
  • एनटीपीसी 344
  • हिंडाल्को 961
  • आयशर मोटर्स 7345
  • बजाज फायनान्स 1002
  • एचडीएफसी लाइफ 552
  • अॅक्सिस बँक 1301
  • टायटन 4550
  • महिंद्रा आणि महिंद्रा 3088
  • लार्सन टुब्रो 3883
  • टाटा स्टील 187
  • बीईएल 407
  • टाटा मोटर्स 332
  • कल्याण ज्वेलर्स 443
  • स्विगी 280
  • लोढा डेव्हलपर्स 1192
  • केन्स टेक्नॉलॉजी 3429



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत