► वृत्तसंस्था इस्लामाबाद
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) तणाव सातत्याने वाढत आहे. जम्मू- काश्मीर संयुक्त आवामी कृती समितीने (‘जेएएसी’) पाकिस्तान सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. आपल्या 38 मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर त्यांना मोठ्या आंदोलनांना सामोरे जावे लागेल, असा इशारा ‘जेएएसी’ने पाकिस्तानी सरकारला दिला आहे.
सध्याचा मुद्दा 27 जुलै रोजी होणाऱ्या प्रादेशिक निवडणुकांचा आहे. 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने, ‘जेएएसी’ने मुझफ्फराबादकडे एका मोठ्या मोर्चाची घोषणा केली आहे. हे आंदोलन भडकल्यास या प्रदेशातील गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या राजकीय लढाईंपैकी एक असू शकते, असे संकेत मिळत आहेत.
