![]()
मुंबईत मरीन ड्राईव्हजवळ फेरफटका मारताना ‘के. रुस्तम’ या ऐतिहासिक दुकानातून आईस्क्रीम सँडविच खाण्याची अनेकांना सवय आहे. मात्र, या प्रसिद्ध आणि जुन्या आईस्क्रीम पार्लरबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या दुकानावर छापा टाकला असता, तिथे जिवंत उंदीर, घोंघावणाऱ्या माशा आणि मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आले आहेत. स्वच्छतेच्या गंभीर उल्लंघनामुळे FDA ने कारवाईचा बडगा उगारत ‘रुस्तम’ आईस्क्रीम पार्लरचा परवाना तत्काळ निलंबित केला आहे. यासोबतच नागपूर आणि धुळ्यातील प्रसिद्ध हॉटेल्सवरही FDA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ‘रुस्तम’ आईस्क्रीम पार्लरमध्ये घाणीचे साम्राज्य चर्चगेट येथील वीर नरिमन रोडवर, ब्रेबॉर्न स्टेडियम हाऊसमध्ये असलेले ‘रुस्तम’ आईस्क्रीम हे १९५३ सालापासून मुंबईकरांच्या पसंतीचे ठिकाण आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या FDA च्या तपासणीत या ऐतिहासिक दुकानाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दुकानात ‘शेड्यूल ४’ मध्ये नमूद केलेल्या स्वच्छतेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना पुढील गंभीर त्रुटी आढळल्या: या सर्व गंभीर उल्लंघनांची दखल घेत, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ३२(३) नुसार ‘रुस्तम’चा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नागपुरात मिठाईच्या दुकानात ‘मेलेला उंदीर’ मुंबईसोबतच नागपुरातही FDA ने मोठी कारवाई केली आहे. नागपूरच्या पांचपावली येथील ‘हिरा स्वीट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या मिठाईच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान या दुकानात अन्नपदार्थ तयार करण्याचे काम सुरू असतानाच चक्क एक ‘मेलेला उंदीर’ आढळून आला. हा प्रकार ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळणारा असल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. धुळ्यात विनापरवाना हॉटेलवर कारवाई याच मोहिमेअंतर्गत धुळे येथील ‘हॉटेल पाटीलवाडा’ या आस्थापनेवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. हे हॉटेल कोणत्याही वैध अन्न परवान्याशिवाय सुरू असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके (परवाना आणि नोंदणी) नियम, २०११ चे उल्लंघन केल्याप्रकरणी या हॉटेलचाही अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. राज्यात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यवसायिकांवर FDA ने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे अन्न व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. हेही वाचा.. मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका, अद्याप 6 ते 7 जण अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आज एक मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी दुपारी अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा महाकाय डोंगर शेजारील प्रशासकीय इमारतीवर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी अडकले होते. कालपासून सुरू असलेल्या युद्धपातळीवरील बचावकार्याला आता मोठे यश आले असून, आतापर्यंत एकूण ९ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अद्यापही ६ ते ७ जण या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर वाचा.. राज्यात पावसाचा जोर ओसरला:विदर्भात विश्रांती, तरीही पुणे-साताऱ्यासह 17 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना महत्त्वाचा इशारा गेले चार दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी, धोका मात्र पूर्णपणे टळलेला नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील १७ जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा कायम ठेवला असून, यामध्ये २ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर १५ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
Source link
राज्यात 3 मोठ्या हॉटेल्सवर FDA ची कारवाई:मुंबई, नागपूर आणि धुळ्यातील हॉटेल्सचा भोंगळ कारभार उघड, परवाने तत्काळ निलंबित
