११ जून २०२६ रोजी तुकाराम मुंढे यांना एक टीप मिळाली.. यामध्ये दूधभेसळीसोबतच कृत्रिम दूध निर्मितीची माहिती त्यांना मिळाली. पण लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी या सगळ्याचा सखोल तपास करण्यात आला. त्यानंतर आपल्या धडक आणि धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध क्षेत्रातील आजवरचा सर्वात मोठा आणि थरारक ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. केवळ एखादा छापा टाकून काही लिटर दूध जप्त करणे हा या कारवाईचा हेतू नव्हता, तर थेट ‘कृत्रिम दूध’ बनवणाऱ्या आणि संपूर्ण राज्यात विष पसरवणाऱ्या एका संघटित गुन्हेगारी रॅकेटची पाळेमुळेच उपटून टाकण्यात आली आहेत. या संपूर्ण कारवाईचा थरार, कृत्रिम दुधाचं खतरनाक मॅपिंग आणि तुकाराम मुंढेंनी हे रॅकेट कसं उद्ध्वस्त केलं, याचा हा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊया.. नमस्कार मी कोमल आचरेकर