ज्या लोकांना विदर्भातील प्रश्न काय आहे हे माहिती नाही, त्यांनी काही काम केले नाही. शेंबूड काढायचा माहित नाही, ते लोकं देवाभाऊंवर बोलत आहेत.हे या लोकांचे अज्ञान आहे. अरे ज्या विदर्भातून मुख्यमंत्री येतात त्या विदर्भाचा गेली 60 वर्षे विदर्भाचा राष्ट्रव
.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, रोहित पवार आणि त्यांच्या अजोबांनी महाराष्ट्रात कुठे विकासाची वीट लावली आहे का? कुठे विकास केला आहे का? त्यांना काय माहिती आहे का? आमच्याच सरकारच्या काळात मिसिंग लिंकसाठी जगामध्ये ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहे त्या इथे वापरण्यात आल्या आहे. ते काय कारखाना ढापण्याइतके सोपे नाही. कारखाना ढापण्याची प्रक्रिया सोपी आहे.

अमृतांजन पुलावर किती दरडी कोसळल्या?
गोपीचंद पडळकर म्हणाले की, मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात जे काम सुरू आहे ते उघड्या डोळ्यांनी पाहा ना. तुमच्या अजोबांच्या काळात लोणावळ्यातील बोर घाटातील अमृतांजन फुल आहे, तिथे आजवर किती अपघात झालेत, दरडी पडून किती लोकांचा बळी गेला, हे बघायला हवं. ज्यांचा जन्म भ्रष्ट्राचारात झाला त्यांच्या पिंढ्याच त्यामध्ये आहेत त्यांना दुसरे काय दिसणार? असा सवाल पडळकरांनी केला आहे.
कर्नाटकात वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना द्या
गोपीचंद पडळकर म्हणाले की, मुंबई, नाशिक, कोकण, पुणे आणि ठाणे या विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. पण मी ज्या मतदारसंघातून येतो त्या जत, मंगळवेढा, सांगोला या भागात आताही पाऊस पडलेला नाही तिथे शेतकऱ्यांचे पीके धोक्यात आली आहेत. कोयना आणि वारणा धरणात पाण्याचा साठा झाला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमची मागणी आहे की कर्नाटकमध्ये वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालु्क्यांना देण्यात यावे.
संबंधित बातमी वाचा…
देशात मोदी अन् फडणवीसांचे बिंग फुटले:फडणवीसांनी आम्हाला विकास शिकवू नये, त्यांनी केलेली कामे महिनाभरात कोसळतात- संजय राऊत

भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून मेट्रोपासून ते लोकल ट्रेन आणि बेस्ट बसपर्यंत सर्वच वाहने गळत आहेत. प्रत्येक कामात आधी कमिशन खाण्याच्या वृत्तीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. कालच्या एकाच पावसाने या सरकारची पोलखोल केली असून, जनतेचे तब्बल 4,500 कोटी रुपये एका झटक्यात वाहून गेले आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘विकासपुरुष’ नरेंद्र मोदी आणि ‘इन्फ्रामॅन’ देवेंद्र फडणवीस यांचे बिंगआता पूर्णपणे फुटले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. येथे वाचा संपूर्ण बातमी
‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून सरकारवर रोहित पवारांचा हल्लाबोल:’अजितदादांच्या अपघातातील कंपनीलाच कंत्राट?’, चौकशीची मागणी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल्याच्या घटनांमुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकल्पाचे कंत्राट नवयुगा आणि अॅफकॉन या कंपन्यांना देण्यात आल्याचे सांगत, “अजित पवारांच्या अपघाताशी संबंधित प्रकरणात ज्या कंपनीचे नाव समोर आले होते, त्याच्याशी संबंध असलेल्या कंपनीलाच मिसिंग लिंकचे कंत्राट देण्यात आले,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
उद्घाटनाच्या दोनच महिन्यांत फज्जा:काय आहे मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प? खड्डे आणि दरड दुर्घटनेवरून विरोधकांचे सरकारला जळजळीत प्रश्न

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पहिल्याच मुसळधार पावसात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे दोन महिने उलटत नाहीत, तोच बोगद्यांमध्ये झालेली पाण्याची गळती, मुख्य रस्त्याला गेलेले तडे आणि दरड दुर्घटना यामुळे या 7 हजार कोटींच्या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरूनच आता विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरत, हा तांत्रिक चमत्कार आहे की कंत्राटदारांना पोसणारा कमिशनखोरीचा नवा मार्ग?” असे जळजळीत प्रश्न उपस्थित करत सरकारची कोंडी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
