Headlines

Pune Ashadhi Ekadashi Wari 2026 Saint Tukaram Maharaj Palkhi will Depart from Dehu; राम कृष्ण हरी! तुकोबारायांचे आज प्रस्थान, आळंदीमध्येही तयारी अंतिम टप्प्यात; अशी असेल कार्यक्रमाची रुपरेषा


Pune Saint Tukaram Maharaj Palkhi Ceremony : देहू-आळंदी परिसरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आल्याने पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्याची आस बाळगणाऱ्या भाविकांना संतभेट दूर वाटू लागली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि संत तुकाराम महाराज संस्थान यांनी वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रस्थान सोहळ्याला येऊ नये, असे आवाहन केले आहे.

Pune Saint Tukaram Maharaj Palkhi Ceremony
देहू संत तुकाराम महाराज पालखी आज प्रस्थान(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज, मंगळवारी (सात जुलै) देहू येथून प्रस्थान होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. मुसळधार पावसामुळे प्रस्थान सोहळ्याच्या तयारीला मर्यादा आहेत. मात्र, ग्रामस्थ आणि वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. ते तुकोबासंगे सावळ्या विठूरायाला भेटण्यासाठी आतुर आहेत. देहू येथील मुख्य मंदिरात सोहळ्याची जय्यत तयारी चालू आहे.

सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ

सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ तयार करण्यात आला आहे. भरपावसात रथाची मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. इंद्रायणीला पूर आल्याने नदीकिनारी बॅरिकेडींग केले असून, वारकऱ्यांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra TimesAshadhi Wari: आषाढी वारीलाही मुसळधार पावसाचा फटका; ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याआधी वारकऱ्यांना तातडीचे आवाहन

आळंदीत प्रस्थान सोहळा मर्यादित स्वरुपात

आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे उद्या, बुधवारी प्रस्थान होणार आहे. त्या अनुषंगाने नवीन रथ अर्पण सोहळा सोमवारी आयोजित केला होता; परंतु मुसळधार पावसामुळे कार्यक्रम स्थगित करण्यात आला. पावसामुळे प्रस्थान सोहळाही मर्यादित स्वरूपात होणार असून, वारकरी, मानकरी, ग्रामस्थ, पोलिस आदी १६६० जणांना फक्त मंदिर प्रवेश मिळेल.

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा रुपरेषा

पहाटे ५ वा. ‘श्रीं’ची आणि शिळा मंदिर महापूजा

पहाटे ५.३० वा. तपोनिधि नारायण महाराज समाधी पूजा

सकाळी ९ वा. पादुका महापूजा, इनामदार वाडा

सकाळी १० वा. काल्याचे किर्तन

दुपारी २.३० वा. प्रस्थान सोहळा प्रारंभ

सायंकाली ५ वा. पालखी मंदिर प्रदक्षिणा

सायंकाळी ६ वा. समाजआरती व मुक्काम, इनामदार वाडा
Maharashtra TimesLonavala News : लोणावळ्यात कलम 163 लागू, मुसळधार पावसाने संभाव्य धोका लक्षात घेता निर्बंध लागू

नाथांच्या दिंडीचेआज प्रस्थान

श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा आज, मंगळवार सात जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. नाथांच्या दिंडीचे आज, मंगळवारी (सात जुलै) प्रस्थान होणार आहे.
Maharashtra TimesST Shivneri Bus : अतिवृष्टीचा एसटी प्रवाशांना फटका, मुंबई-पुणे शिवनेरीच्या फेऱ्या पुढील सूचनेपर्यंत रद्द, महामंडळाचा मोठा निर्णय
आज, मंगळवारी दुपारी बारा वाजता पैठण येथील गावातील नाथ मंदिर येथून नाथांच्या पालखीचे प्रस्थान होईल. विसावा ओटा येथून सायंकाळी साडेसहा वाजता पालखी चनकवाडीकडे प्रस्थान करणार आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजन होऊन पालखी प्रस्थान करणार आहे. पैठणच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह परिसरातील अनेक दिंड्या, वारकरी पैठणनगरीत दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा