Headlines

जिल्हा बँकेच्या निकालानंतर दानवे-काळे यांच्यात कलगीतुरा‎:दानवेंची वरिष्ठांकडे तक्रार- काळे‎, ते महायुतीतूनच लढणार होते- दानवे‎




जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा ‎‎निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत ‎‎आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात ‎‎आहेत. महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक ‎‎लढवणारे अंबादास दानवे यांनी ‎‎खळबळजनक आरोप केला आहे. कल्याण ‎‎काळे, जगन्नाथ काळे, किरण पाटील ‎‎डोणगावकर यांनाच महायुतीच्या पॅनलमधून ‎‎उभे राहायचे होते. मात्र तसे झाले नाही.‎म्हणून काळेंनी स्वतंत्र पॅनल उभा केला,‎असा आरोप दानवेंनी केला. महाविकास ‎‎आघाडीशी गद्दारी करणाऱ्या दानवेंची तक्रार ‎‎आम्ही महाविकास आघाडीच्या वरिष्ठांकडे ‎‎करणार आहोत, असे खासदार कल्याण‎काळे यांनी सांगितले.‎ स्वाभिमानासाठी लढलो, दानवेंनी‎ शब्द फिरवला कल्याण काळे ‎‎महाविकास आघाडीने स्वतंत्र पॅनल‎निश्चित केला होता. त्यानुसार आम्ही‎‎उमेदवार देण्याचे ठरवले‎‎होते. काँग्रेसचे गेल्या‎‎वेळी ६ संचालक होते.‎‎त्यामुळे महायुतीने‎‎आम्हाला जागा ठरवून‎‎देणे योग्य नव्हते. आम्ही‎स्वाभिमानाने निवडणूक लढवली. जनतेला‎पर्याय दिला. एकत्र निवडणूक लढवायची‎ठरलेली असतानाही दानवे यांनी‎महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.‎त्याचा थेटपरिणाम निवडणुकीच्या‎निकालावर झाला. आम्ही या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मविआच्या वरिष्ठ‎नेत्यांकडे करणार आहोत.‎ महाविकास आघाडीत चर्चाच‎नाही : अंबादास दानवे‎ याबाबत अंबादास दानवे म्हणाले की,‎‎खासदार कल्याण‎‎काळे, जगन्नाथ काळे,‎‎किरण पाटील‎‎डोणगावकर हे तीन‎‎जण महायुतीच्या‎‎शेतकरी पॅनलकडून‎निवडणूक लढण्यास तयार होते. मात्र‎त्यांना केवळ दोन जागा देण्यात आल्या‎होत्या. कल्याण काळे आणि जगन्नाथ‎काळे या दोन भावांत एकमत न झाल्याने‎त्यांना इकडे येता आले नाही. महाविकास‎आघाडी असती तर महायुतीच्या इतक्या‎जागा बिनविरोध कशा आल्या. काँग्रेसने‎तिथे काय केले, अशी प्रतिक्रिया दानवे‎यांनी दिली आहे.‎ अध्यक्षांची लवकरच निवड‎ बँकेच्या संचालकपदाचे निकाल‎लागल्यानंतर पंधरा दिवसांत बँकेच्या‎अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया केली जाते.‎त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी‎विभागीय निबंधकांना अहवाल सादर‎करतात. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते.‎पंधरा दिवसांच्या आत अध्यक्षाची निवड‎केली जाते. त्यानुसार २० तारखेपूर्वी‎बँकेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे.‎‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत