Headlines

raigad police save 72-year-old woman by carrying her on shoulder amidst heavy rain


रायगड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली. यामुळे एसटी बसमधील सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला. रायगड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हेल्प फाउंडेशनच्या मदतीने युद्ध पातळीवर प्रवाशांना रेस्क्यू केलं.

raigad news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : महाराष्ट्रावर सध्या पावसाचं मोठं संकट उभं राहीलं आहे. खरंतर पाऊस पडणं हे संकट असूच शकत नाही. पण पाऊस ज्या आक्राळविक्राळ स्वरुपात कोसळतोय त्यामुळे संकट उभं राहिलं आहे. रायगडमध्ये जणू काही आभाळ फाटलं आहे की काय? अशी परिस्थिती आहे. रायगडमधील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसाचा प्रकोप असाच सुरु राहिला तर महापुराचा धोका आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाने एक एसटी बस पुराच्या पाण्यात अडकली होती. या एसटी बसमधील प्रवाशांना थरारकपणे पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं.

खरंतर रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कर्जत-पेण मार्गावरील सारसई येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एसटी बसमधील आठ प्रवाशांची रसायनी पोलिसांनी धाडसी बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली आहे. या बचावकार्यात हेल्प फाउंडेशन, रसायनीच्या स्वयंसेवकांनीही मोलाचे सहकार्य केले.

एसटी बस पुराच्या पाण्यात अडकली, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल

सारसई परिसरात पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एसटी बस पुराच्या पाण्यात अडकली होती. बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर रसायनी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हेल्प फाउंडेशनच्या मदतीने त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सर्व आठ प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविले.

बचावकार्यातला भावनिक क्षण

या बचावकार्यातील सर्वाधिक भावनिक क्षण म्हणजे 72 वर्षीय ज्येष्ठ महिला प्रवाशाला चालणे शक्य नसल्याचे लक्षात येताच एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून सुरक्षितस्थळी पोहोचविले. या संवेदनशील आणि धाडसी कृतीमुळे उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.

प्रवाशांनी मानले पोलिसांचे आभार

रसायनी पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. प्रवाशांनीही बचाव पथकाचे आभार मानले. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांकडून विविध ठिकाणी सतत गस्त, मदतकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.

raigad news

प्रशासनाची नागरिकांना कळकळीची विनंती

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात पूरग्रस्त रस्त्यांवरून प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि पोलीस व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात उद्यादेखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच संभाव्य धोका लक्षात घेता उद्या रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा