Nagpur Crime: प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या वडिलांना प्रियकराने निर्घृणपणे संपवलं. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी रेल्वे येथील जमील सोसायटी परिसरात ही घटना घडली.

नेमकं प्रकरण काय?
मेहताबसिंग चौधरी (वय ४३) असे मृताचे तर रोहित गौतम असे अटकेतील मारेकरी जावयाचे नाव आहे. चौधरी हे श्रमिक होते. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मेहताबसिंग यांच्या मुलीचे रोहितसोबत प्रेमसंबंध होते. याबाबत मेहताबसिंग यांना माहिती मिळाली. त्यांनी अन्य युवकासोबत मुलीचे लग्न करून दिले. त्यांच्या मुलीला पहिल्या पतीपासून मुलगा झाला. त्यानंतर सतत दोघांमध्ये वाद व्हायला लागले. मुलगी माहेरी परतली. त्यानंतर ती नेहमी रोहितला भेटायला लागली. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले. परंतु, यास मेहताबसिंग विरोध करायला लागले.
Crime News: एकाच कुटुंबातील पाच जण रहस्यमयरीत्या बेपत्ता, मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात; एका सदस्याबाबत माहिती उघड
रोहितपासून मेहताबसिंग यांची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिली. मुलगी पहिल्या पतीकडे परत जावी, असा तगादा मेहताबसिंग यांनी लावला. यावरून रोहित व त्यांच्यात अनेकदा वादही झाला. रोहितने मेहताबसिंग यांची हत्या करण्याचा कट आखला. शुक्रवारी रात्री मेहताबसिंग घरासमोरील टिनाच्या शेडमध्ये झोपले. रोहितने दारू प्यायली. सायकलने तो तेथे आला. पलंगाजवळीलच कुऱ्हाडीने डोके व गळ्यावर वार करून त्याने मेहताबसिंग यांची हत्या केली. नंतर सायकल घेऊन पसार झाला.
Nagpur Crime : एक लाखांची सुपारी अन् कुख्यात गुंडाला पत्नीनेच संपवलं, नागपुरात नेमकं काय घडलं?
काही वेळाने मेहताबसिंग यांची पत्नी तेथे आली. तिला मेहताबसिंग रक्ताच्या थारोळ्यात दिसले. तिने आरडाओरड केली. शेजारी जमले. एका नागरिकाने मानकापूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मानकापूर व गुन्हेशाखेचे युनिट दोन आणि पाचचे पथक तिथे पोहोचले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन रोहितला अटक केली. त्याने मेहताबसिंग यांची हत्या केल्याचे मान्य केले. त्यानंतर त्याला मानकापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

