Pune lohgad fort rise in tourism at siya goyal point poses threat to historical heritage; ‘सिया पॉइंट’ पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड; लोहगडाची बदनामी होत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांना पत्र
Pune lohgad fort rise in tourism at siya goyal point poses threat to historical heritage; ‘सिया पॉइंट’ पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड; लोहगडाची बदनामी होत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांना पत्र
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: यंदाच्या पावसाळ्यात साहसी पर्यटक केवळ ‘सिया पॉइंट’ पहायचे म्हणून येत आहेत. लोहगडाची अशा घटनेमुळे बदनामी होत असून ‘सिया पॉइंट’ हे नाव इंटरनेटवर लोकेशन म्हणूनही प्रसिद्धी मिळवत आहे. यामुळे लोहगडासारख्या ऐतिहासिक किल्ल्याची आणि जागतिक वारसा स्थळाची बदनामी होत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली आहे. लोहगडावरील घटनेमध्ये दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. मात्र या घटनेनंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोहगडाची बदनामी सुरू झाली असून ही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशासाठी धोक्याची घंटा आहे, असे गिर्यारोहण महासंघाने म्हटले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र लिहिण्यात आले आहे.
लोहगड हा केवळ पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा आहे. . अशा गडाची ओळख एखाद्या गुन्हेगारी घटनेशी जोडणे, त्या ठिकाणाला नवीन नाव देणे किंवा त्यावर विनोद, मीम्स, रील्स आणि सनसनाटी स्वरूपातील मजकूर प्रसारित करणे, हा आपल्या इतिहासाचा आणि समाजाच्या भावनांचा अवमान आहे. गेल्या काही दिवसांत लोहगडावरील एका कड्याचा ‘सिया पॉइंट’ असा उल्लेख समाजमाध्यमांवर आणि काही डिजिटल माध्यमांमध्ये केला जात असून, गुगल मॅपवरही अशा प्रकारचे उल्लेख दिसून येत आहेत. परिणामी, त्या ठिकाणी केवळ उत्सुकतेपोटी नागरिकांची गर्दी होत आहे.
ऐतिहासिक गड-किल्ले हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांची ओळख इतिहासाने व्हावी, गुन्हेगारी घटनांनी नव्हे. त्यामुळे डिजिटल माध्यमांमध्ये ऐतिहासिक स्थळांची बदनामी करणाऱ्या चुकीच्या नामकरणावर, दिशाभूल करणाऱ्या मजकुरावर आणि सनसनाटी प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने स्वतंत्र धोरण तयार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांनाही संवेदनशील संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे महासंघाने या पत्रात नमूद केले आहे.
धोरणाची आवश्यकता
व्यावसायिक प्री-वेडिंग शूट, फॅशन शूट, जाहिराती, सोशल मीडिया कंटेंट निर्मिती यासाठी स्पष्ट धोरण, पूर्वपरवानगी, आचारसंहिता आणि उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईची तरतूद असावी. गड-किल्ल्यांचा सन्मान व पावित्र्याच्या संरक्षणासाठी दीर्घकालीन राज्यस्तरीय धोरण आखाावे, अशी मागणी गिर्यारोहकांनी केली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा