Headlines

विजयाची पाटी कोरीच! कॅप्टन श्रेयस अय्यरने 3 जणांना पराभवासाठी ठरवलं व्हिलन, कोणाची नावं घेतली?


Shreys Iyer News : दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये भारतावर इंग्लंडने चार विकेटने मात केली. भारताचा हा पराभव म्हणजे हातातोंडाशी आलेला विजय हिसकावल्यासारखा होता. भारताच्या या पराभवासाठी नेमकं कोण जबाबदार आहे हे सांगताना कॅप्टन अय्यरने थेट नावं घेतली आहेत. कोण आहेत ते जाणून घ्या.

Shreyas iyer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये शनिवारी भारतावर इंग्लंडने ४ विकेटने विजय मिळवला आहे. मँचेस्टमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पहिल्यांदा बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये १९०-७ धावा केल्या होत्या. भारताकडून अभिषेक शर्माने ४३ धावा आणि ईशान किशनने ४९ धावा केल्या होत्या. मात्र पाठलाग करताना इंग्लंड संघाचा डाव गडगडला होता, परंतु एकट्या जेकब बेथल याने नाबाद ७६ धावा करत सामना इंग्लंडला जिंकवून दिला. खरं पाहायला गेलं तर हा सामना भारताच्या हातामध्ये होता, मात्र एक १७ ओव्हर भारतासाठी गेमचेंजर ठरली. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रतिक्रिया देताना कोणाला कोणाला व्हिलन ठरवलं जाणून घ्या.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी कोणावरही बोट दाखवणार नाही. पहिल्या नो बॉल नंतर वाटलं होतं की तो कमबॅक करेल. पण १७ वी ओव्हर पूर्णपणे गेमचेंजर ठरली आणि तिथेच आम्ही बॅकफूटवर गेलो. पिचवर उसळी सारखी बदलत होती, तरीही आम्ही चांगला स्कोअर केला होता. खरं सांगायचं तर पहिल्या 15 ओव्हर आपण पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं. मग अचानक जेकब आला आणि त्याने मॅच पलटवली. त्याला खेळपट्टी चांगली माहित होती. सॅम करननेही ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलिंग केली त्याचं प्लॅनिंग एकदम पक्कं होतं. वैभव बेधडक असून नेटमध्ये तो ज्या इंटेन्सिटीने फलंदाजी करतो त्यातून खूप शिकण्यासारखं आहे. मला वाटलं नव्हतं की तो दबावामध्ये येईल, असं श्रेयस अय्यर म्हणाला.
Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi Debut : वैभव सूर्यवंशीने इतिहास रचलाच! सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडत टीम इंडियाकडून पदार्पण
श्रेयस अय्यरने या पराभवासाठी जेकब बेथल, सॅम करन आणि आपल्या रवी बिश्नोईला पराभवासाठी जबाबदार ठरवलं आहे. श्रेयस अय्यरने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून तो एकदाही विजयी झालेला नाही. जेकब याने नाबाद ७६ धावा, करनने तीन महत्वाच्या विकेट घेतल्या. भारताने आयर्लंडविरूद्धचे दोन सामने गमावले होते, त्यानंतर इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंड संघाने हा विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
Maharashtra TimesIND vs ENG 2nd T20 : इंग्लंडकडून भारताचा दुसऱ्या टी-20 मध्ये पराभव, 22 वर्षांच्या पोराने फिरवली संपूर्ण मॅच, सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट

वैभव सूर्यवंशीचे पदार्पण

बेबी बॉस म्हणून ओळखला जाणारा भारताचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी याने आज पदार्पण केले. वैभव भारताकडून सर्वात कमी वयात करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. वैभवने दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडला आहे. भारताकडून त्याने १५ वर्षे ९९ दिवसांचा असताना हा विक्रम नावावर केलाय. आज पठ्ठ्याने १४ धावा काढल्या यातही त्याने २ षटकार लगावले. भारतीय संघाला मालिका बरोबरीत करायची असेल तर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा