Nashik Rain House Slab Collapse: मुसळधार पावसात कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घराचा स्लॅब कोसळून आजी व नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर यात १८ वर्षीय प्रणिता गंभीर जखमी आहे.

कलेक्टर पट्टा भागातील रुद्र हनुमान मंदिराच्या पुढे राहणाऱ्या राजेंद्र पंढरीनाथ येवले यांच्या घराचा स्लॅब शुक्रवारी दुपारी पाऊस सुरू असताना कोसळला. घरात प्रणिता, चेतन व त्यांची आजी विमलबाई होत्या. शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे घरातील स्लॅब कोसळल्याने प्रणिता, चेतन व विमलबाई गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने बचावकार्य करून तिघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. यात चेतन व त्याची आजी विमलबाई येवले यांचा उपचारादरम्यान मृत्यृ झाला. छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Nashik News: ‘डिफेन्स’ अधिकाऱ्याकडे सापडले घबाड; देवळालीच्या तत्कालीन CEOकडे 113 टक्के अधिक अपसंपदा
शाळेवर कोसळले झाड;
३१ विद्यार्थी बचावले
निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर शुक्रवारी (दि. ३) दुपारी एकच्या सुमारास शाळेलगतच्या शेतातील मोठे कडुनिंबाचे झाड कोसळल्याची घटना घडली. शाळेत त्या वेळी ३१ विद्यार्थी उपस्थित होते. सुदैवाने झाडाचा केवळ शेंड्याचा भाग इमारतीवर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आणि विद्यार्थी व शिक्षक सुखरूप बचावले. झाड कोसळताना झालेल्या प्रचंड आवाजामुळे विद्यार्थ्यांना वीज पडल्याचा भास झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. मात्र, शिक्षकांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवून शांत केले. झाडाच्या फांद्या पडल्याने किरकोळ नुकसान झाले असून, जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
Simhastha Kumbh Mela : 1 हजार 230 कोटींचा निधी, ‘डेडलाइन’ पाळण्यासाठी खालच्या पातळीचं काम; कुंभमेळाच्या तोंडावर नाशिकच्या रस्तेकामांचं धक्कादायक वास्तव समोर
पावसाचा फटका
– मालेगावात स्लॅब कोसळल्याने १८ वर्षांची तरुणी गंभीर जखमी
– ब्राह्मणगाव विंचूर येथील शाळेवर झाड कोसळल्यानंतर विद्यार्थी भेदरले
– धोकादायक वृक्षांची तातडीने छाटणी करण्याची ग्रामस्थांची मागणी

