Sachin Goswami : युट्युबवर आक्षेपार्ह थंबनेल देऊन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे एपिसोड पोस्ट करणाऱ्यांना सचिन गोस्वामी यांनी सुनावलं असून हे प्रकार लवकरात लवकर थांबवण्याचा इशारा दिला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ हा लोकप्रिय कार्यक्रम असून परदेशातही या कार्यक्रमाचा चाहतावर्ग आहे. हास्यजत्रेची परदेशवारीही करण्यात आली आहे. या कार्यक्रमांनाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोनी मराठीवर प्रसारित करण्यात येतो. तसेच ‘सोनी लिव्ह’ या अधिकृत ऍप्लिकेशनवरही हास्यजत्रेचे एपिसोड्स पाहता येतात. मात्र, काही युट्युब चॅनल्स अनधिकृतपणे हास्यजत्रेचे बहुतांश एपिसोड युट्युबवर अपलोड करतात. या एपिसोडला विचित्र थंबनेल देतात, त्यामुळे प्रेक्षकांचीही दिशाभूल होते. या प्रकरणी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी संतप्त पोस्ट शेअर केली असून हे प्रकार त्वरित थांबवण्याचा इशारा दिला आहे.
सचिन गोस्वामी यांची पोस्ट
सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘विकृतीचा कळस…’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेली ८ वर्षे सोनी मराठी वाहिनीवर सादर होत आहे..१००० भाग पूर्ण होत आहे आणि जगभरातील मराठी प्रेक्षकात प्रचंड लोकप्रिय आहे. हल्ली हास्यजत्रेचे अनेक भाग सोनी मराठीच्या ऑफिशअल चॅनेलवर आणि पोर्टलवर तर दिसतातच, पण इतर यूट्यूब पोर्टल्स ही दाखवतात..ही युट्यूब चॅनेल्स अधिकृत आणि अनधिकृत पद्धतीने प्रसारित करत आहेत आणि पैसेही कमवत आहेत.’
‘पण या सर्व भागांचं प्रसारण करताना अत्यंत अश्लील Thumbnail आणि कॅप्शन टाकून कार्यक्रमाची बदनामी करत आहेत. ज्या कंटेंटवर आपण आपली पोट भरत आहेत, त्यावर असे बदनामी कारक थंबनेल आणि कॅप्शन करताना थोडी ही लाज वाटत नसावी का? अत्यंत क्लेशदायक आहे हे…कृपया प्रेक्षकांनी या प्रकारामुळे कार्यक्रमाच्या दर्जा विषयी शंका घेवू नये. आम्ही दर्जा राखण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. संबंधितांनी हे प्रकार त्वरित थांबवावे आणि कुणास असे आक्षेपार्ह फोटो किंवा कैप्शन दिसल्यास त्या व्हिडिओस रिपोर्ट करावे..धन्यवाद’ असं म्हणत सचिन यांनी इशारा दिला आहे.
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
दरम्यान, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, निखिल बने, ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, मंदार मांडवकर, रसिका वेंगुर्लेकर, श्रमेश बेटकर यांसारखे कलाकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करत आहेत.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा