Bus Accident: बस खोल दरीत कोसळून तब्बल ४० प्रवाशांचा शेवट झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इस्लामाबाद: पाकिस्तानात शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. खैबर पख्तूनख्वाह आणि बलुचिस्तान सीमेच्या जवळ भरधाव वेगातील बस खोल दरीत कोसळली. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. त्यात ४० जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाना सर परिसरात हा भीषण अपघात झाला. बस महामार्गावरुन भरधाव वेगात जात होती. तितक्यात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. यानंतर बस रस्त्यावरुन खाली उतरली आणि खोल दरीत कोसळली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस प्रवाशांनी खच्चून भरली होती. रस्त्यात एक दुसरी बस बंद पडली. बराच वेळ उलटूनही ती सुरू झाली नाही. या नादुरुस्त बसमधील प्रवासीदेखील याच बसमध्ये होते. त्यामुळे बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. याच कारणामुळे बसला अपघात झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. अपघातस्थळी मदत आणि बचाव पथकं पोहोचली आहेत. जखमींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. Indian Family Dies: अमेरिकेत हॉटेलला आग, भारतीय कुटुंबाचा हृदयद्रावक अंत; फ्रंट डेस्कनं दिलेला सल्ला जीवघेणा ठरला पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारींनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. अपघातामधील मृत प्रवाशांच्या कुटुंबियांबद्दल त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनीदेखील अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं. प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याला वेग देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जखमींना उत्तम उपचार द्या. त्यात कोणतीही कमतरता ठेवू नका, असे निर्देश बुगती यांनी दिले. Indian Sailor Dies: किडनी, हृदय, फुफ्फुस..; व्हेनेझुएलाच्या समुद्रात भारतीय खलाशासोबत घातपात? बॉडीमधून 21 अवयव गायब बलुचिस्तान सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या दोन्ही जिल्ह्यांचं प्रशासन, बचाव पथक आणि अन्य संबंधित विभाग घटनास्थळी मदत करत आहेत. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अपघातग्रस्त बस ३६ प्रवाशांसह क्वेटाहून निघाली होती. पण रस्त्यात अन्य एक बस बंद पडली होती. त्या बसमधील प्रवासी याच बसमध्ये चढले. यानंतर बसमध्ये ४८ प्रवासी झाले. अपघातावेळी बसमध्ये क्षमतेहून अधिक प्रवासी होते. अपघातात ४० प्रवाशांचा मृत्यू झाला.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा