Headlines

What is Silent Hypoxia? Know low oxygen symptoms without breathlessness and lung health risks; सायलंट हायपोक्सिया म्हणजे काय? ऑक्सिजन कमी असूनही श्वास का लागत नाही ते जाणून घ्या


सायलंट हायपोक्सिया ही अशी धोकादायक स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते, पण रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत नाही. कोविडसारख्या संसर्गांमध्ये ही समस्या अधिक दिसून आली. मेंदूला कार्बन डायऑक्साइड वाढल्यावरच श्वासोच्छ्वासाचा इशारा मिळत असल्याने अनेकदा ऑक्सिजन कमी असूनही व्यक्ती सामान्य दिसते. ओठ निळे पडणे, सतत थकवा, मानसिक गोंधळ आणि अशक्तपणा ही याची महत्त्वाची सुरुवातीची लक्षणे आहेत. फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम, सायलंट हायपोक्सियामागची कारणे आणि वेळेवर उपचार का आवश्यक आहेत, याबद्दल जाणून घ्या.

182
Silent Hypoxia causes and remedies(फोटोiStock)
सामान्यतः, जेव्हा शरीरातील ऑक्सिजन कमी होतो, तेव्हा आपल्याला दम लागतो, छातीत धडधडते किंवा श्वास जोरात घेतला जातो. मात्र, सायलंट हायपोक्सियामध्ये रुग्ण शांतपणे बोलत असतो किंवा मोबाइल वापरत असतो, पण त्याचे पल्स ऑक्सिमीटर ८०% किंवा ७०% इतकी कमी ऑक्सिजन लेव्हल दाखवत असते. ‘हार्वर्ड हेल्थ’ नुसार, हे शरीराच्या चेतावणी प्रणालीचे (Warning System) अपयश आहे.

श्वास घेण्याचा त्रास का जाणवत नाही?

182
श्वास घेण्याचा त्रास का जाणवत नाही?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनवर प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार,

आपल्या मेंदूला ‘श्वास घे’ असा सिग्नल देणारी यंत्रणा दोन गोष्टींवर अवलंबून असते:

  • ऑक्सिजनची कमतरता : जेव्हा ऑक्सिजन कमी होतो.
  • कार्बन डायऑक्साइड (CO2) वाढणे : जेव्हा रक्तातील CO2 ची पातळी वाढते.

गंमत अशी आहे की, मेंदूला ऑक्सिजन कमी झाल्यापेक्षा रक्तातील CO2 वाढल्याची जाणीव जास्त लवकर होते. सायलंट हायपोक्सियामध्ये (विशेषतः कोविड किंवा फुफ्फुसांच्या काही संसर्गामध्ये) फुफ्फुसे रक्तातील CO2 बाहेर काढण्याचे काम व्यवस्थित करत असतात, पण नवीन ऑक्सिजन आत घेण्यास ती असमर्थ ठरतात. जोपर्यंत शरीरात CO2 साचत नाही, तोपर्यंत मेंदूला ‘श्वास गुदमरतोय’ असा सिग्नल मिळत नाही, आणि रुग्णाला आपण संकटात आहोत हे कळतच नाही.

फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम

183
फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम

  • हळूहळू संसर्ग : फुफ्फुसांमधील हवेच्या पिशव्या (Alveoli) हळूहळू निकामी होऊ लागतात. त्या पूर्णपणे निकामी होईपर्यंत फुफ्फुसे लवचिक राहतात, त्यामुळे श्वास घेताना फुफ्फुसांवर ताण येत नाही.
  • रक्तवाहिन्यांचे आकुंचन : फुफ्फुसातील ज्या भागात संसर्ग झाला आहे, तिथल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे उर्वरित भागातून रक्तपुरवठा सुरू राहतो. यामुळे सुरुवातीला रुग्णाला काहीच जाणवत नाही.

प्रमुख लक्षणे आणि धोक्याचे संकेत (Early Warning Signs)

184
प्रमुख लक्षणे आणि धोक्याचे संकेत

अमेरिकन लंग असोसिएशनच्या रिपोर्टनुसार, जरी रुग्णाला श्वास घेताना त्रास होत नसला, तरी शरीर काही इतर सूक्ष्म संकेत देते:

  • ओठ किंवा नखे निळी पडणे : रक्तातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्वचेचा रंग बदलू लागतो (Cyanosis).
  • सततचा थकवा : साधे चालणे किंवा बोलतानाही अचानक खूप थकवा जाणवणे.
  • मानसिक गोंधळ (Confusion) : मेंदूला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे विचार करण्याची क्षमता मंदावणे किंवा झोप येणे.
  • नाडीचे ठोके वाढणे : ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी हृदय अधिक वेगाने पंप करू लागते.

सायलंट हायपोक्सिया टाळण्यासाठी काय करावे?

185
सायलंट हायपोक्सिया टाळण्यासाठी काय करावे?

क्लेव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार,

  • पल्स ऑक्सिमीटरचा वापर : जर तुम्हाला फुफ्फुसांचा संसर्ग किंवा फ्ल्यू सारखी लक्षणे असतील, तर दर ६ तासांनी ऑक्सिजन तपासा. जर तो ९४% च्या खाली आला, तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • सिक्स मिनिट वॉक टेस्ट (6-Minute Walk Test) : ६ मिनिटे वेगाने चालल्यानंतर जर ऑक्सिजन लेव्हल ३% ते ५% ने घसरत असेल, तर ते सायलंट हायपोक्सियाचे लक्षण असू शकते.
  • झोपण्याची स्थिती (Proning) : पोटावर झोपल्यामुळे फुफ्फुसांच्या मागील भागातील हवेच्या पिशव्या उघडतात, ज्यामुळे ऑक्सिजन मिळवण्यास मदत होते.

किडनी व मेंदूच्या पेशींवरही होतो परिणाम

186
किडनी व मेंदूच्या पेशींवरही होतो परिणाम

याशिवाय, काही संशोधनांमध्ये असेही आढळले आहे की शरीरात दीर्घकाळ ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यास मूत्रपिंड (Kidneys) आणि मेंदूच्या पेशींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी राहिल्यास शरीरातील अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा मिळत नाही. त्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होणे, अचानक चक्कर येणे, डोके जड वाटणे किंवा एकाग्रता कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. अनेकदा ही चिन्हे थकवा किंवा अशक्तपणामुळे आहेत असे समजून दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी किंवा आधीपासून श्वसनाशी संबंधित त्रास असलेल्या लोकांनी ताप, खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शनदरम्यान दिवसातून काही वेळा ऑक्सिजन तपासणे अधिक सुरक्षित मानले जाते.

सायलंट हायपोक्सिया हा एक ‘छुपा शत्रू’ आहे. अनेक रुग्ण दवाखान्यात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो कारण त्यांना स्वतःला त्रास जाणवत नसतो. त्यामुळे, विशेषतः श्वसनाचे विकार असताना केवळ ‘श्वास लागण्यावर’ अवलंबून न राहता ‘ऑक्सिमीटर’च्या रीडिंगवर विश्वास ठेवणे जीव वाचवू शकते.

प्रतीक्षा सुनील मोरे

लेखकाबद्दलप्रतीक्षा सुनील मोरेप्रतीक्षा सुनील मोरे या एक अनुभवी आणि कुशल मराठी कंटेंट रायटर व पत्रकार असून त्यांना मीडिया आणि डिजिटल क्षेत्राचा सुमारे 12 वर्षांपेक्षा प्रदीर्घ अनुभव आहे. पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ABP Majha या प्रख्यात वृत्तवाहिनीमधील इंटर्नशिपपासून केली. कालांतराने त्यांनी वृत्तवाहिनी, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि OTT माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत आपली कारकीर्द सातत्याने उंचावत नेली आहे.

पुढे त्यांनी TV9 मराठी वृत्तवाहिनीत पूर्णवेळ पत्रकारिता सुरु केली, जिथे प्रत्यक्ष रिपोर्टिंग आणि बातमी संकलनाच्या प्रक्रियेत त्यांची पत्रकार म्हणून भक्कम जडणघडण झाली. घटनास्थळी जाऊन बातम्यांचा मागोवा घेणं, तथ्य पडताळणं आणि प्रेक्षकांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचवणं या मूलभूत पत्रकारितेच्या मूल्यांवर त्यांची भक्कम पकड आहे.

पत्रकारीतेमधील अनुभवानंतर त्यांनी kesari tours and travels कंपनीत ट्रॅव्हलिंग व टूरिझम या विषयावरही प्रभावी लिखाण करत Travelling क्षेत्रातही अनुभव संपादन केला. त्यानंतर त्यांना Zee Entertainment OTT प्लॅटफॉर्मवर क्रिएटीव्ह राईटिंगच्या कौशल्यावर नवी जबाबदारी हाताळण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी डिजिटल कंटेंटच्या सादरीकरणातील बारकावे आत्मसात केले. कंटेंटची मांडणी, अचूक वर्गीकरण आणि प्रेक्षकांच्या आवडीनुसार सादरीकरण, मराठी मालिकांचे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आकर्षक Synopsis लिखाण या प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याखेरीज कारकीर्दीच्या अनेक टप्प्यावर त्यांनी स्क्रिप्ट रायटिंग, स्टोरी डेव्हलपमेंट आणि सोशल मीडिया हाताळण्याचा व्यापक अनुभव मिळवला.

कथा आणि स्क्रिप्ट लेखन, वेबसाईट व ब्लॉगसाठी लेखन, अचूक संपादन कौशल्य आणि कठोर डेडलाईन्समध्ये काम पूर्ण करण्याची क्षमता हे त्यांच्या व्यावसायिक व्यक्तिमत्त्वाचे ठळक गुण आहेत . विषयाचा सखोल अभ्यास करून तो सोप्या, स्पष्ट, वाचकांच्या मनाला भिडेल व पटेल आणि परिणामकारक भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे त्यांच्या लेखनाचं बलस्थान आहे. नियोजनबद्ध कामाची सवय, संघटन कौशल्य आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता यामुळे त्या प्रत्येक जबाबदारीत यशस्वी ठरल्या आहेत .

गेल्या 6 वर्षांपासून प्रतीक्षा या लाइफस्टाईल विभागासाठी सातत्याने काम करत आहेत. फॅशन, हेल्थ, रिलेशनशिप, प्रेग्नेंसी पॅरेंटिंग, प्रवास, करिअर आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. केवळ ट्रेंड सांगणं नव्हे, तर त्या ट्रेंडमागची कारणं, सामाजिक परिणाम आणि वाचकांच्या दैनंदिन आयुष्यात त्याचा उपयोग कसा होऊ शकतो, हे सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

गंभीर रिसर्च करण्याची सवय, विषयांमध्ये बारकाईने शिरण्याची वृत्ती आणि प्रत्येक लेखातून वाचकांना काहीतरी नवं देण्याची धडपड यामुळे प्रतीक्षा यांनी लाइफस्टाईल पत्रकारितेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाचकांना केवळ माहिती देणं नव्हे, तर त्यांना विचार करायला लावणं आणि त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देणं, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश असतो.

कामाव्यतिरिक्त त्यांना वाचन, स्वतःसाठी लेखन, प्रवास आणि व्यायामाची विशेष आवड आहे . विविध विषयांवरील वाचनामुळे त्यांच्या लेखनाला अधिक खोली मिळते, तर प्रवासातून मिळणारे अनुभव त्यांच्या आशयाला व्यापक दृष्टिकोन देतात. सातत्य, अभ्यासू वृत्ती आणि लेखनावरील प्रामाणिक प्रेम यामुळे प्रतीक्षा सुनील मोरे यांनी डिजिटल पत्रकारितेत स्वतःची वेगळी आणि ठाम ओळख निर्माण केली आहे.

शैक्षणिक दृष्ट्या त्यांनी Journalism या विशेष विषयासह Bachelor of Mass Media ही पदवी कीर्ती महाविद्यालय, मुंबई येथून 2015 साली पूर्ण केली आहे. शिक्षणातून मिळालेलं तांत्रिक ज्ञान आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांचा संगम त्यांच्या लेखनात स्पष्टपणे दिसून येतो.आणखी वाचा