London Marathi Family Aditi Paralkar Rakesh Pai Death : मृत्यूच्या काही आठवडे आधी त्या कुटुंबाच्या अपार्टमेंटमधून ‘ओरडण्याचे आणि किंचाळण्याचे’ आवाज ऐकू आल्याचे रहिवाशांनी सांगितले

मुलाच्या आजारपणामुळे जीव दिल्याचा अंदाज
स्थानिक खासदार नील कॉयल यांच्या माहितीनुसार, सिड याला जन्मापासूनच मूत्रपिंडाच्या आजारासह अनेक गंभीर व्याधी होत्या आणि त्याच्या याच आजारपणामुळे कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. २७ मे रोजी सकाळी ७:२९ वाजताच्या सुमारास प्रत्यक्षदर्शींनी आपत्कालीन सेवांना याची माहिती दिली, त्यानंतर घटनास्थळीच या तिघांना मृत घोषित करण्यात आले. हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न होते आणि पती-पत्नी दोघेही यूकेत सल्लागार म्हणून कार्यरत होते.
‘रॉबिन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेशचे कार्यक्षेत्र फायनान्स हे होते, तर अदितीने बांधकाम क्षेत्रात अनेक वरिष्ठ पदे भूषवली होती. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, अदितीच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितले की, ‘सिड’च्या आजारपणामुळे ती नैराश्य आणि मानसिक आरोग्याशी संबंधित इतर समस्यांचा सामना करत होती.
Crime News : निसर्गरम्य डोंगराचा फोटो काढला, झूम करुन पाहताच डोळे विस्फारले, विरारमध्ये 25 वर्षीय तरुणाला झाडावर बॉडी दिसली
अदितीवर मुलाच्या उपचाराचा ताण
युनायटेड किंगडममध्ये जन्मलेल्या सिडला किडनीचा आजार होता; त्याला बोलता येत नव्हते आणि त्याला अंशतः व्यंग तसेच लर्निंग डिसअॅबिलीटी होत्या. तिच्या मित्र-मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार, सिडच्या शिक्षणाची बहुतांश जबाबदारी अदितीनेच पेलली होती. सिडवर विशेष वैद्यकीय उपचार करण्यासाठी या जोडप्याने सुमारे सहा वर्षांपूर्वी यूके सोडले होते.
अदितीचा जन्म आणि बालपण मुंबईत गेल्यामुळे, तिथे तिला मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांकडून अधिक आधार मिळू शकणार होता. परंतु भारतातील डॉक्टरांना ‘सिड’च्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा घडवून आणण्यात अपयश आल्यानंतर, ते गेल्या वर्षीच यूकेला परतले होते, असे समजते.
VIDEO | मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं?
मित्र परिवाराला मोठा धक्का
“त्या दोघांसाठीही हा अत्यंत तणावपूर्ण काळ होता, पण विशेषतः अदितीला या परिस्थितीचा सामना करणे खूप कठीण जात होते. यूकेमध्ये तिचे कोणीही नातेवाईक नव्हते आणि तिची नोकरीही खूप धावपळीची व जबाबदारीची होती, त्यामुळे सर्व गोष्टी सांभाळणे तिला खूप कठीण झाले होते. याचा तिच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला. कदाचित तिच्यासाठी हा भार असह्य झाला असावा. ते एक अतिशय छान कुटुंब होते आणि जे काही घडले आहे, त्यामुळे आम्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे” असे एका मित्राने सांगितले.
घरात आठवड्याभरापूर्वी ओरडण्याचे आवाज
मृत्यूच्या काही आठवडे आधी त्या कुटुंबाच्या अपार्टमेंटमधून ‘ओरडण्याचे आणि किंचाळण्याचे’ आवाज ऐकू आल्याचे काही रहिवाशांनी सांगितले. त्याच इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने सांगितले, “गेल्या दोन आठवड्यांपासून मला ओरडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज येत होते. त्यानंतर ते आवाज थांबले. पोलिसांनी माझ्या दरवाजाची बेल वाजवून विचारले की, मला ओरडण्याचे किंवा किंचाळण्याचे आवाज ऐकू आले होते का. मी त्यांना ‘हो’ असे सांगितले आणि मला वाटले की हे कौटुंबिक भांडण असावे.”
Punjab Doctor Death : पतीचे हॉस्पिटलमधील तरुणीशी संबंध, CCTV मध्ये नको ते दिसलं, सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरचा गूढ अंत
‘द गार्डियन’शी बोलताना एका पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, त्यांच्या मृत्यूकडे ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून पाहिले जात आहे. या घटनेत इतर कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही असेही प्रवक्त्याने नमूद केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूचे नेमके कारण एका अधिकृत चौकशीदरम्यान निश्चित केले जाईल; त्यासाठी अद्याप तारीख ठरलेली नाही.

