Xi Jinping: विकसनशील देशांसाठी चीन हा आदर्श आहे, असं शी जिनपिंग यांनी वक्तव्य केलं. पक्षाच्या १०५ व्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

बीजिंगमधील ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे झालेल्या त्यांच्या भाषणात २०२१ मध्ये पक्षाच्या शताब्दी सोहळ्यात केलेल्या भाषणातील अनेक मुद्द्यांचे प्रतिबिंब दिसले. त्यात सक्षम सैन्याचे महत्त्व आणि तैवानला चीनच्या नियंत्रणाखाली आणण्याचा मुद्दा यांचाही समावेश होता.
Venkatesh Doppalapudi : हॅलो, इथे एक गाडी बुडतेय, त्यात एक माणूसही आहे; फोन येताच यंत्रणांची धावाधाव, मुसळधार पावसाने आयटी कर्मचाऱ्याचा जीव घेतला
गेल्या १४ वर्षांपासून सत्तेवर असलेले शी जिनपिंग म्हणाले, ‘श्रीमंत देशांना जे साध्य करण्यासाठी शतके लागली, ते चीनने अवघ्या काही दशकांत करून दाखवले. मावतेसमोरील प्रश्न सोडवण्यासाठी समान भविष्यकालीन उद्दिष्टांवर आधारित समुदायाची उभारणी करावी , असे आम्ही मानतो. त्यासाठी चिनी विद्वत्ता, उपाय आणि चीनची ताकद उपलब्ध करून देण्याची आमची तयारी आहे.
भाषणातील ठळक मुद्दे
-जागतिक व्यवस्था बदलून तिच्यात विकसनशील देशांचे हिताचे प्रतिबिंब अधिक चांगल्या प्रकारे पडावे, अशी चीनची भूमिका आहे. सध्याची व्यवस्था बदलण्याचा हेतू नाही.
-जग नव्या अस्थिरता व परिवर्तनाच्या काळात प्रवेश करीत असून, मानवजात निर्णायक वळणावर.
-जागतिक शांतता आणि विकासाला चालना देण्यासाठी नव्या स्वरूपातील आंतरराष्ट्रीय संबंधांची उभारणी करण्याचा चीनचा निर्धार
-चिनी लष्कराला अधिक वेगाने जागतिक दर्जाच्या क्षमतेपर्यंत नेण्याची गरज आहे.
AI Data Centers: AI चा गेम ओव्हर? 79 टक्के डेटा सेंटर्ससमोर ब्लॅकआऊटचं संकट; दिग्गज टेक कंपन्यांना धडकी भरली
‘हाँगकाँगची स्वायत्तता घटती’
तैपेई : राष्ट्रीय सुरक्षा आणि केंद्रीय नेतृत्वाखालील शासनपद्धतीवर चीनकडून दिला जाणारा वाढता भर यामुळे हाँगकाँगमधील विधिमंडळ आणि न्याय व्यवस्थेतील नियंत्रण-संतुलन व्यवस्था कमकुवत झाली आहे, असा इशारा तैवानच्या मेनलँड अफेअर्स कौन्सिलने (एमएसी) दिला आहे. हाँगकाँग चीनकडे हस्तांतरित होऊन २९ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालात हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. ‘वन कंट्री, टू सिस्टिम्स’ या चौकटीखाली हाँगकाँगवरील राजकीय नियंत्रण वाढत असून त्याची स्वायत्तता कमी होत चालल्याचे या अहवालात नमूद केल्याचे वृत्त ‘द तैपेई टाइम्स’ने दिले आहे.

