Headlines

पंजाबच्या पार्श्वभूमीवर बेतलेली , पण अपूर्ण राहिलेली सूडकथा, तगडी स्टारकास्ट, कधी रीलिज होणार अब होगा हिसाब २?


Ab Hoga Hisab Season 2:गेल्या काही दिवसांपासून अब होगा हिसाब या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची चर्चा सुरू होती. अखेर हा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ab Hoga Hisab 2:
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: येत्या काही दिवसांत ओटीटीवर अनेक नवीन वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही जुन्या वेब सीरिजचे पुढचे सीझनही प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी आहे एक आहे ‘ अब होगा हिसाब ‘ चा दुसरा सीझन.

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित क्राइम-थ्रिलर ड्रामा मालिका ‘अब होगा हिसाब’ चा पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर, आता निर्माते याचा दुसरा भाग म्हणजेच ‘सीझन २’ घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत.

पहिल्या सीझनची अपूर्ण गोष्ट होणार पूर्ण!

पहिल्या सीझनमध्ये दाखवण्यात आले होतं की, बॉबी मनोचा (शाहीर शेख) कॅनडामधून डिपोर्ट होऊन पंजाबला परततो, पण हे सत्य तो आपल्या कुटुंबापासून लपवून ठेवतो. आपल्या लहान भावाला, बंटी मनोचा (अविनाश मिश्रा) एका चांगल्या भविष्यासाठी कॅनडाला पाठवण्याचं त्याचं स्वप्न असतं. मात्र, एका अशा वळणावर ही कथा येऊन थांबते जिथं लोभ, फसवणूक आणि गुन्हेगारीच्या गर्तेत हे कुटुंब अडकतं.

पहिला सीझन एका रोमांचक टप्प्यावर संपला होता, ज्यामुळं प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत होते. आता ‘सीझन २’ मध्ये हा सूडाचा प्रवास कुठपर्यंत पोहोचणार आणि अंतिम ‘हिशोब’ कसा पूर्ण होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

तगडी स्टारकास्ट आणि दमदार अभिनय
या सीरिजचे दिग्दर्शन दिव्यांशू मल्होत्रा यांनी केलं असून, या सीझनमध्येही बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेता संजय कपूर एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तर शाहीर शेख आणि अविनाश मिश्रा बॉबी आणि बंटी या दोन भावांच्या मुख्य भूमिकांमध्ये आहेत.

Maharashtra TimesNational Doctors day : दवाखाने आणि त्यांची डॉक्टरकी, ‘आय अ‍ॅम सॉरी’ एवढंच बोलायचं अन्.. , छोट्या पडद्यावरच्या वैद्यकीय विश्वाच्या काही रंजक गोष्टी
मौनी रॉय आणि निमृत कौर अहलुवालिया कथेला नवीन वळण देणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना संजय कपूर यांनी सांगितलं की, या सीरिजमधील नातेसंबंधांचे पदर आणि कथेची गुंतागुंत मला खूप भावली. पहिल्या भागानंतर आता दुसऱ्या भागात प्रेक्षकांना अधिक थरार आणि ड्रामा पाहायला मिळेल.
Maharashtra TimesVanita Kharat: घर घेतल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात आणि पती सुमितच्या आयुष्यात आणखी एक आनंद, जवळच्या मित्रमंडळींसोबत केलं सेलिब्रेशन
कुठे आणि कधी पाहता येणार?
पंजाबच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ही सूडकथा आणि कौटुंबिक भावनांचा थरार येत्या ३ जुलै २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ओटीटी ॲमेझॉन एमएक्स प्लेअर वर ही सीरिज पाहता येणार आहे. विशेष म्हणजे सीरिज प्रेक्षकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा