Headlines

भावा जिंकलंस! बापाच्या हातात पोराने दिली मर्सिडीजची चावी, यशस्वीकडून फादर्स डेला लय भारी गिफ्ट


Yashasvi Jaiswal Gift His father : पाणीपुरीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मदत करणाऱ्या यशस्वी जयस्वाल याने फादर्स डे दिवशी दिलेल्या गिफ्टची सर्वत्र चर्चा आहे. पठ्ठ्याने वडिलांना दिलेल्या या गाडीची किंमत जाणून घ्या.

Yashswi jaiswal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : रविवारी फादर्स डे निमित्त सर्वांनी आपल्या वडिलांचे फोटो स्टेटसला ठेवल्याचं पाहायला मिळालं. काहींनी याचं औचित्य साधत आपल्या वडिलांनी खास भेटवस्तूही दिल्या. अशाच प्रकारे भारताचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल यानेही त्याच्या वडिलांना एक लय भारी गिफ्ट दिलं. यशस्वी भारताचा युवा खेळाडू असून त्याने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवले आहे. आताच शनिवारी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये यशस्वीने शतकी खेळी करत भारताला विजयी घोषित केले होते. पण यशस्वी आता चर्चेत आलाय तो त्याने फादर्स डेला वडिलांना दिलेल्या गिफ्टने. पठ्ठ्याने आपल्या वडिलांना मर्सिडीजची चावी दिली.

यशस्वीचा खूप मोठा संघर्ष राहिला आहे, ज्यावेळी तो स्ट्रगल करत होता त्यावेळी काही पाणीपुरीवाल्यांना व्यवसायात तो मदत करत होता. यशस्वीने जिद्दीने भारतीय संघात जागी मिळवली. घरगुती क्रिकेटमध्ये नाव केल्यावर आयपीएलमध्ये त्याने छाप पाडली आणि संघात जागा बनवली होती. यशस्वी जयस्वाल याने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत कसोटी, वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करत दिसत आहे.
Maharashtra TimesIND W vs SA W : भारताने तिथेच सामना गमावला, कॅप्टन हरमनप्रीतने पराभवासाठी एका खेळाडूला ठरवलं व्हिलन, पाहा कोणाला?
यशस्वीने वडिलांना मर्सिडीज GLS ही लग्जरी कार गिफ्ट केली. या कारची किंमत १.३२ कोटी आहे. यशस्वीच्या भावाने इंस्टाग्रामवर कारचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये यशस्वीचे आई-वडील होते. एका बापासाठी आणखी काय हवं, मुलाच्या लाखोंच्या रूपयांच्या गाडीमध्ये बसण्यापर्यंत जयस्वाल कुटुंबाचा सोपा नव्हता. यशस्वीने दिलेल्या गिफ्टची सर्वत्र चर्चा होत असून सोशल मीडियावर व्हायरल गाडीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Maharashtra TimesTeam India : इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, मुंबईकर खेळाडूवर अन्याय, शतक ठोकूनही निवड नाहीच

यशस्वी जयस्वालची निवड का नाही?

यशस्वी जयस्वाल याची आगामी इंग्लड दौऱ्यात वनडे संघात भारतीय संघात निवड झाली नाही. शतक करूनही त्याला संघात स्थान न दिल्याने अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. यशस्वीची निवड न होण्यामागे महत्त्वाचं कारण असे की आता संघात विराट कोहली आणि रोहित कोहली असल्याने त्याची जागा होत नाहीये. त्यासोबतच सलामीला शुभमन गिलसोबत रोहित असणार त्यानंतर इशान किशनही असल्याने जयस्वालची जागा होतान दिसत नाहीये. त्यामुळे यशस्वीला जेव्हा संधी मिळेल तेव्हा दमदार प्रदर्शन करावं लागणार आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा