Headlines

Middle East Crisis: प्रत्येक घरात हाहाकार माजला असता! कतारनं इराणला मोठी ऑफर दिलेली; नाकारल्यानं जगावरचं संकट टळलं


Middle East Crisis: मध्य पूर्वेतील संघर्ष कायम असताना कतारनं इराणला दिलेल्या ऑफरची चर्चा आहे. कतारकडून देण्यात आलेली ऑफर इराणनं नाकारली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि जगावरचं संकट टळलं.

middle east crisis iran qatar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तेहरान: इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्षाचे संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. मध्य पूर्वेतील अस्थिरतेमुळे जगभरात खनिज तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत. मध्य पूर्वेत संघर्ष सुरू असताना कतारनं इराण सोबत एक करार करण्याचा प्रयत्न केला होता. संपूर्ण जगाच्या ऊर्जा बाजाराला हलवून टाकण्याचं सामर्थ्य या करारात होतं. पण इराणनं प्रस्ताव मान्य केला नाही. कतारची ऑफर इराणकडून नाकारण्यात आली. यानंतर इराणनं कतारमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले.

मध्य पूर्वेत संघर्ष पेटताच कतारनं इराणशी संपर्क साधला. रास लाफान औद्योगिक प्रकल्पावर इराणनं हल्ले करू नयेत अशी कतार ची इच्छा होती. रास लाफान जगातील सर्वात मोठा एलएनजी उत्पादन प्रकल्प आहे. या प्रकल्पातून जगभरात एलएनजी पुरवठा केला जातो. इराणनं रास लाफानवर हल्ला करू नये यासाठी कतारकडून संपर्क साधला गेला. त्या बदल्यात कतार गॅस उत्पादन थांबवायच्या विचारात होता. वॉशिंग्टन पोस्टनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
Maharashtra TimesUS Attacks Ships: US च्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा अंत; ट्रम्पकडून कारवाईचं कौतुक, मोदी सरकार काय भूमिका घेणार?
गॅस उत्पादन बंद झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढतील. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल यांच्यावर युद्ध संपवण्यासाठी दबाव वाढेल, असा कतारचा कयास होता. पण ही योजना यशस्वी झाली नाही. १८ मार्चला इराणनं रास लाफान आणि पर्शियन खाडी परिसरातील अन्य गॅस प्रकल्पांवर हल्ला केला. इस्रायलनं इराणच्या एका मोठ्या गॅस प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर इराणकडून कतारच्या रास लाफानवर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात आली.

कतारकडून इराणला पाठवण्यात आलेला संदेश एका गुप्तचर यंत्रणेनं इंटरसेप्ट केला होता. ही यंत्रणा इराणी नेत्यांच्या संदेशांवर, संवादांवर लक्ष ठेवून होती. कतारकडून आलेला प्रस्ताव इराणनं स्वीकारला नाही. युद्धाच्या तिसऱ्याच दिवशी कतारनं रास लाफान गॅस प्रकल्प बंद केला होता. इराणच्या हल्ल्यात प्रकल्पाचं नुकसान झाल्याची माहिती यानंतर पसरली. पण सॅटेलाईट फोटोंमधून वेगळीच माहिती समोर आली. सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रकल्पाला कोणतंही मोठं नुकसान झालं नव्हतं. त्यामुळे कतारनं जास्त नुकसान दाखवून मुद्दामहून प्रकल्प बंद केला होता का, असा प्रश्न निर्माण झाला.
Maharashtra TimesDonald Trump: भारतीय जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! ट्रम्प यांनी इराणवर खापर फोडलं; वातावरण तापलं
मध्य पूर्वेत २८ फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झालं. अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र मोहिमेला लक्ष्य करत मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं मध्य पूर्वेतील देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा सुरू केला. सोबतच होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केली. त्यामुळे जगातील २० टक्के तेल वाहतूक विस्कळीत झाली. इंधनाचे दर आभाळाला भिडले.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा