BJP suspends 23 leaders in Konkan Sindhudurg ahead of ZP Election for Activity against Party; निवडणुकांच्या तोंडावर भाजपची जागेवर कारवाई; एक-दोन नव्हे, तब्बल 23 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, धक्कादायक कारण समोर
BJP suspends 23 leaders in Konkan Sindhudurg ahead of ZP Election for Activity against Party; निवडणुकांच्या तोंडावर भाजपची जागेवर कारवाई; एक-दोन नव्हे, तब्बल 23 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, धक्कादायक कारण समोर
सिंधुदुर्ग : कोकणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपाने पक्ष शिस्तीच्या विरोधात काम करणाऱ्या तब्बल 23 पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 23 जणांना पक्षातून तब्बल सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक काळात पक्षविरोधी काम केल्यास थेट कारवाई केली जाईल असाच संदेश स्पष्ट इशारा या कारवाईतून भाजपने दिला आहे.
पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज कायम ठेवणे अथवा विरोधी उमेदवारांना मदत करणे, या आरोपावरून भाजपच्या 23 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
या कारवाईमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी सभापती वंदना किनळेकर, माजी सभापती शर्वाणी गावकर, राजन चिके यांसारख्या भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असून एकूण 23 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. Ajit Pawar : अजित पवारांच्या अंत्यविधीला जायचं होतं पण… जुना सहकारी हळहळला, कारण सांगताना रडला, महिन्याभरापूर्वी दादांसोबत… सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे पुढीलप्रमाणे : राजन बाळकृष्ण चिके (फोंडा, ता. कणकवली), राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर (कोनाळकट्टा, ता. दोडामार्ग), श्रीमती सुजाता अजित पडवळ (तुळस, ता. वेंगुर्ला), श्रीमती वंदना किरण किनळेकर (म्हापण, ता. वेंगुर्ला), विजय महादेव रेडकर (मातोंड, ता. वेंगुर्ला), जनार्दन रुक्मानंद कुडाळकर (आडेली, ता. वेंगुर्ला), डायगो उर्फ मायकल फ्रान्सिसी डिसोजा (कोलगाव, ता. सावंतवाडी), जितेंद्र पांडुरंग गावकर (माजगाव, ता. सावंतवाडी), योगेश अशोक केणी (इन्सुली, ता. सावंतवाडी), स्वागत रघुवीर नाटेकर (इन्सुली, ता. सावंतवाडी), नितीन एकनाथ राऊळ (इन्सुली, ता. सावंतवाडी) यांच्यावर बडगा उगारण्यात आला आहे. Pune News : अजितदादांनंतर राष्ट्रवादीने आणखी एक शिलेदार गमावला, शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याचे निधन याशिवाय, श्रीमती शर्वाणी शेखर गावकर (आरोंदा, ता. सावंतवाडी), उल्हास उत्तम परब (सातार्डा, ता. सावंतवाडी), श्रीमती स्नेहल संदीप नेमळेकर (आरोंदा, ता. सावंतवाडी), श्रीमती साक्षी संदीप नाईक (ता. दोडामार्ग), श्रीमती सुप्रिया शैलेश नाईक (ता. दोडामार्ग), श्रीमती सुनीता कमलाकर भिसे (ता. दोडामार्ग), प्रवीण नारायण गवस (ता. दोडामार्ग), अनिरुद्ध फाटक (ता. दोडामार्ग), श्रीमती सोष्मिता अरविंद बांबर्डेकर (ओरोस, ता. कुडाळ), योगेश राजाराम तावडे (ओरोस, ता. कुडाळ), रुपेश अशोक पावसकर (नेरूर, ता. कुडाळ) आणि विजय वासुदेव नाईक (आडेली, ता. वेंगुर्ला) या 23 जणांवर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Ajit Pawar Last Call: बाहेर चाललोय, आता भेट होणार नाही; अजित पवारांचा प्रफुल्ल पटेलांशी शेवटचा संवाद
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा