![]()
जानवळ गावात मंत्री पंकजा मुंडे यांची वाट पाहत गावकरी मोठ्या संख्येने थांबले होते.पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करावे आणि नंतर प्रचार सभा घ्यावी असे गावकऱ्यांचा आग्रह होता. मात्र उशीर झाल्याने पंकजा मुंडे या सभा घेऊन त्या बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ पोहचल्या.पंकजा मुंडे यांना गावकऱ्यांनी आता पुष्पहार अर्पण करायचा नाही अशी भूमिका घेतली.पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांना विनंती केली मात्र गावकरी ऐकायच्या मनस्थित नव्हते.अखेर पंकजा मुंडे यांनी दुरूनच बाबासाहेबांच्या पुतळ्याला हात जोडले आणि त्या पुढच्या सभेला गेल्या.
Source link
Pankaja Munde : सभेनंतर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेल्या, पंकजा मुंडेंना गावकऱ्यांनी अडवलं
