Headlines

Nagpur Crime: नागपुरात FDAची मोठी कारवाई! 55 लाखांचे फ्रुट ड्रिंक जप्त, ओआरएसला पर्याय म्हणून विक्री – fda action in nagpur fruit drink worth 55 lakhs seized being sold as alternative to ors


म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ओआरएसला पर्याय म्हणून परिचित ‘एनर्झल’ या पेयाची ‘एनर्जी ड्रिंक’ नावाने विक्री करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा फास आवळला. या फ्रुट ड्रिंकचा (एनर्झल) ५५ लाख ६७ हजार ७७९ रुपये किमतीचा ३६ हजार ३६६ किलो साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला. एफडीए नागपूरच्या गुप्तवार्ता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.

एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाचे साहाय्यक आयुक्त यदुराज दहातोंडे, अन्नसुरक्षा अधिकारी ललित सोयाम, रावसाहेब वाकडे, महेश चहांदे यांच्या पथकाने हिंगणा एमआयडीसी भागातील सोनेगाव येथील मे. एफ. डी. सी. लिमिटेड या वितरक पेढीला भेट दिली. या पेढीद्वारे विक्री करण्यात येणाऱ्या ‘एनर्झल’ या पेयाच्या लेबलवर ‘एनर्जी अँड इलेक्ट्रोलेट ड्रिंक’ असे लिहिलेले होते. हे संयुक्त नसल्याने त्यावर कारवाई करण्यात आली.

Maharashtra TimesAkanksha Chaturvedi : आई, बाबा मला माफ करा, NEET परीक्षा पुन्हा देण्याचं धाडस नाही, नागपुरात विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यावतीने २६ मे रोजी छत्रपती संभाजीनगरच्या वळूज येथील एफडीसी लिमिटेड या एनर्झल उत्पादन करणाऱ्या पेढीला पत्र पाठवून एनर्झल हे फ्रुट ड्रिंक ‘अनब्रँडेड’ असल्याचे कळविले होते. अशी सूचना देऊनही नागपुरात त्याची विक्री होत सुरू होती. त्यामुळे एफडीएने फ्रुट ड्रिंक एनर्झल, ऑरेंज फ्लेवर, ब्लिट्स फ्लेव्हर, ॲपल फ्लेव्हर, फ्रिमिक्स फॉर वॉटर बेस्ड फ्लेव्हर ड्रिंक, लाइम फ्लेव्हर एनर्जी ड्रिंक आणि इलेक्ट्रोलाइट ड्रिंक असे १० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले. १ लाख ७९ हजार ६२७ बाटल्या व पाकिटे असा साठा जप्त करण्यात आला, असे एफडीएने सांगितले.

Maharashtra TimesMLC Election: विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार? ‘औपचारिक लढतीत अर्थ नाही’, शेवटच्या क्षणी बावनकुळेंचं काँग्रेसला महत्त्वाचं आवाहन!
संशय आल्यास इथे साधा संपर्क
विश्लेषणासाठी घेण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६अंतर्गत करण्यात येईल. तोपर्यंत जप्त केलेला साठा सील करून ठेवला आहे. अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी या कारवाया केल्या.

Maharashtra Timesगडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठवा! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी
सात लाखांचा औषधसाठा पकडला
विनापरवाना औषध विक्री प्रकरणी धंतोली येथील क्लिनिकवर छापा टाकून सुमारे सात लाखांचा औषधसाठाही जप्त करण्यात आला. धंतोली येथील डायमंड वन इमारतीतील न्यू रूट स्किन, लेझर, हेअर ट्रान्सप्लान्ट क्लिनिक येथून या औषधांची विक्री होत होती. साहाय्यक आयुक्त मनीष चौधरी, अंजली मिटकर, औषध निरीक्षक प्रशांत रामटेके, अभिषेक चवरडोल यांनी ही कारवाई केली. औषधांच्या खरेदीसंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी खरेदी बिले सादर केली नाहीत. परवाना नसतानाही १६ रेमेडिज नाशिक या परवानाधारक कंपनीच्या नावाने रुग्णांना औषध विक्री बिले देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले, असे एफडीएने सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत