Headlines

R Ashwin on Vaibhav sooryavanshi debut; सचिनच्या विक्रमाशी बरोबरी कशाला, त्याला सध्या सिनियर्सना पाणी पाजू द्या! आर अश्विन वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूबद्दल असं का म्हणाला?


R Ashwin Vaibhav Sooryavanshi : भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याचे हे मत पाहून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अश्विन एका मुलाखतीत वैभवबद्दल सर्वकाही बोलून गेला आहे. त्याने नेमकं काय म्हटलं आहे?

Vaibhav sooryavanshi debut
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : काल झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा तब्बल ३४ धावांनी पराभव झाला. हा पराभव ऐतिहासिक ठरला. आयर्लंडने यापूर्वी कधीही भारताविरुद्ध सामना जिंकला नव्हता. त्यामुळे हा सामना त्यांनी जिंकला आणि भारताचा दबदबा कुठेतरी कमी झाला. पण कालची मॅच पाहिल्यानंतर अनेकांना असे वाटते आहे, की वैभव सूर्यवंशीला खेळवायला हवे होते. कारण तो आयपीएलचा स्टार आहे. अनेक वेळा त्याने उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. यंदाच्या हंगामात तर तो ऑरेंज कॅप विजेताही ठरला. त्यामुळे आता त्याला बाहेर का ठेवले जात आहे. त्याचा आंतरराष्ट्रिय डेब्यू केव्हा होणार अशी प्रतिक्षा सर्वांना आहे. पण वैभवच्या डेब्यूविरोधात आता एका दिग्गज खेळाडूने त्याचे रोखठोक मत दिले आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने या विषयावर त्याचे मत स्पष्टपणे सांगितले आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या.

अश्विन नेमकं काय म्हणाला?

अश्विनच्या मते सध्यातरी वैभवच्या पदार्पणाची आवश्यकता नाही. त्याला बेंचवरच बसवावे, अशी सूचना त्याने केली आहे. त्याने यामागिल त्याचे कारणही सांगितले आहे. एका यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, केवळ एका विक्रमासाठी दुसऱ्या खेळाडूवर अन्याय कसा करायचा, अश्विनने सलामीवीर संजू आणि अभिषेक यांची बाजू घेतली.

वैभवला झिम्बाब्वे दौऱ्यावर पाठवा

पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, सध्या भारतीय संघात वैभवला स्थान नाही, जर त्यासा संधी द्यायची असेल तर निवड समितीने त्याला झिम्बाब्वे दौऱ्यावर पाठवावे, जिथे सध्याच्या सिनियर सलामीवरांनाही विश्रांती मिळेल. संजू आणि अभिषेक हे वनडे आणि कसोटी संघात नाहीत. हे वर्षही वर्ल्डकपच्या तयारीचे आहे. त्यामुळे त्यांना हे टी-२० खेळता नाही आले तर त्यांचा सराव कुठे होणार, म्हणून त्यांच्या जागी वैभवला खेळवणे हे अन्यायकारक आहे.

Maharashtra TimesShoaib Akhtar : शोएब अख्तरच्या भावाचं निधन, अंत्यविधीला 26/11 आणि पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी उपस्थित, Video समोर

वैभव हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे, पण क्रिकेट हा एक टीमचा खेळ आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. कोणताही संघ हा एका व्यक्तीसाठी बनलेला नसतो. कोच गौतम गंभीर यांनी नेहमी संघाला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. सुपरस्टार संस्कृतीला त्यांचाही विरोध आहे. संजू- अभिषेकने वर्ल्डकपमध्येही चांगली कामगिरी केली. वैभवसाठी त्यांना संधी न देणे हे खेळ भावनेच्या विरोधात असेल, असंही अश्विन म्हणाला आहे.

डगआऊटमध्ये बसला तर काय होईल?

सचिनने १९८९ मध्ये १६ व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघात पदार्पण केले होते. वैभव सध्या १५ वर्षांचा आहे, पुढील वर्षी तो १६ वर्षांचा होणार आहे. त्यामुळे सध्यातरी त्याने कोणते विक्रम बनतायत याकडे न पाहता सिनियर खेळाडूंकडून काय शिकता येईल ते पाहावे, असे रोखठोक मत अश्विनने व्यक्त केले आहे. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनीही आयपीएलमध्ये धावा केल्या आहेत. पण मग आपण रोटेशननुसार पाच सलामीवीर खेळवले पाहिजेत का? तर असं नाही होतं, आपल्याला थोडं समजूतीने घ्यावं लागेल. डगआऊटमध्ये बसल्याने कोणी लहान होत नाही, सिनियर्सला पाणी दिल्याने काही बिघडतं का? त्याचेही एक महत्व आहे. तिथे बसूनही वैभव खूप काही शिकेल. कोणताच खेळाडू हा एका रात्रीत महान होत नाही. एकदा का त्याची संघात एन्ट्री झाली की त्याला बाहेर कोण काढणार? त्याचीही कारकीर्द ही सचिनसारखीच मोठी असणार आहे, असं अश्विननं म्हटले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा