Headlines

18 yrs old shailesh vagdada died due to lack of road in tilonda jawhar; भीषण वास्तव! रस्त्याअभावी 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; झोळी बांधून दवाखान्यात नेताना वाटेतच सोडला जीव


Palghar News: वेळेत उपचार न मिळाल्याने एका १८ वर्षीय युवकाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना जव्हारमध्ये घडली आहे.

palghar news
palghar news(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, जव्हार: जव्हार तालुक्यातील तिलोंडा (आंबेपाडा) येथे रस्त्याअभावी युवकाला जीव गमवावा लागला. १८ वर्षीय शैलेश मगन वागदडा हा युवक गंभीर आजारी असताना वेळेवर उपचार न मिळाल्याने मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी शैलेशला डोली बांधून दवाखान्याकडे नेले. मात्र, तोपर्यंत उशीर झाल्याने त्याचा प्राण वाचू शकला नाहीत. तिलोंडा (आंबेपाडा) हे आदिवासीबहुल गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पावसाळ्यात तर या गावाचा संपर्क पूर्णतः तुटतो. रुग्णवाहिका किंवा चारचाकी वाहन गावात पोहोचू शकत नसल्याने आजारी रुग्णांना खडतर डोंगरवाटांवरून डोलीनेच हलवावे लागते. शैलेशच्या बाबतीतही हेच घडले. प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर दवाखान्यात पोहोचणे शक्य न झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

Maharashtra TimesBMC Mayor: महापौरांसाठी 35 लाखांची कार! प्रमुख नेत्यांनाही अलिशान गाड्या, BMCकडून कोट्यवधींचा खर्च
‘गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता, आरोग्य सुविधा यासाठी मागणी करूनही ग्रामसेवक, सरपंच किंवा संबंधित विभागांकडून कोणताही ठोस पाठपुरावा झाला नाही’, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचीच खैरात झाली असून प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या घटनेने तालुक्यातील दुर्गम भागांतील आरोग्य व दळणवळण व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका तरुणाचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. रस्त्यासह मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Maharashtra TimesMumbai Mayor: मुंबई सोडून जाऊ नका! भाजप, शिवसेना उबाठा पक्षाकडून नगरसेवकांना आदेश
विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात रस्ते व्हावेत यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निधी उपलब्ध करत रस्ते व्यवस्था बळकट व्हावी म्हणून मागणी केली आहे, असे विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी म्हटले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा