नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं असलं तरी चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या पराभवावर भाष्य करताना पक्षावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत त्यावर भाष्य केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यातील 288 नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक यश मिळालं आहे. भाजपला तब्बल 120 जागांवर विजय मिळताना दिसत आहे. असं असलं तरी काही ठिकाणी भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपची ताकद असणाऱ्या ठिकाणी भाजपचा पराभव झालाय. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी भाजपचा पराभव झालाय. या पराभवानंतर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना पक्षावर नाराजी व्यक्त केली. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी आपली भूमिका मांडली.
“चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. आम्ही अपयशाचे कारणीमांसा करु. कारण आता महापालिकाच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्याबाबत कारणीमांसा करुन कुठे कमतरता राहिली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करु”, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. यानंतर पत्रकारांनी सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया फडणवीसांना सांगितली. त्यावर फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.
“पक्षाला दारं असूच नयेत. पक्षाची दारं कोणत्या समजाकरता, कुठल्या व्यक्तीकरता बंद असू नयेत. पक्ष हा बिनादाराचाच असला पाहिजे. फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाहीत, पक्षाला फायदा आहेत की नाही ते आपण बघितलं पाहिजे. आज पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे. समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई आम्ही महापालिका निवडणुकीत देऊ. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महापालिका निवडणूक जिंकून आणू”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
“आम्हाला नागपूर जिल्ह्यात खूप चांगलं यश मिळालं आहे. आमचे पालकमंत्री स्वत: प्रत्येक नगर पालिकेत लक्ष घालून, प्रचार करुन काम केलं. त्यामुळे जवळपास 30 ते 35 वर्षांनी कामठीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. गडचिरोलीमध्येही आम्हाला खूप चांगलं यश मिळालं आहे. जवळपास 15 नगरपालिका अशा आहेत जिथे आम्ही बहुमतात आलो पण दुर्दैवाने आमचे नगराध्यक्ष कमी मतांनी पराभूत झाले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी मानले मतदारांचे आभार, पाहा काय-काय म्हणाले?
“मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे. मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की, एकूण जे नगराध्यक्ष निवडून येतील, त्यापैकी 75 टक्के हे महायुतीचे निवडून येतील. तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे. विशेषत: भारतीय जनता पक्ष हाच पहिला क्रमांकाचा पक्ष आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे.”
“आतापर्यंत माझ्या हाती जे निकाल आले आहेत त्यामध्ये जवळपास 129 नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. आमचे तिघांचे मिळून नगराध्यक्षांचा विचार केला तर जवळपास 75 टक्के महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. नगरसेवकांचा विचार केला तर भाजपने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. 2017 साली आम्ही नंबर एकचा पक्ष होतो. त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते. आता त्याच्या दुप्पट नगसेवक आहेत. आमचे 2500 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत.”
“एकूण नगरसेवकांची संख्या आहे त्यामध्ये 48 टक्के भाजपचे नगरसेवक जिंकून आले आहेत. याचा अर्थ आम्हाला प्रचंड मोठं जनसमर्थन मिळालं आहे. आमचे सहयोगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्याही पक्षांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. आम्ही एकप्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स रिपीट केलेला आहे.”
“या निवडणुकीत पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत होती. त्यांच्या नेतृत्वातील या पहिल्या निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. त्याबद्दल मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे मनापासून अभिनंदन करतो. या निवडणुकीत रविंद्र चव्हाण, आमचे पूर्व अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमचे मंत्रिमंडळाती सहकारी या सर्वांचे अभिनंदन करतो.”
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं की, या निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार आहे. त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले. कारण त्यांना असं वाटत होतं की, आता आपण हरलोय हे लोकांच्या लक्षात आलं तर पुढे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचं मोरल डाऊन होईल. आता ते हे सांगायला मोकळे आहेत की, आम्ही फार सीरिअस नव्हतो.”
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा