Headlines

New York Central Park Horse Carriage Accident Teen Tourist Romanch Mahajan dies while saving Mother Life; घोडागाडीतून आई पडली, 18 वर्षांच्या मुलाचा जीव घाबरा, आईला वाचवण्याच्या नादात रोमांच महाजनचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा


New York Horse Carriage Accident : महाजन कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी घोडागाडी चालकाने गाडी थांबवली आणि तो खाली उतरला, नेमका त्याच क्षणी तो घोडा अचानक उधळला

New York Horse Carriage Accident Romanch Mahajan Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
न्यूयॉर्क : घोडागाडीतून खाली पडलेल्या आपल्या आईला वाचवण्याच्या प्रयत्नात एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क शहरातील सेंट्रल पार्कमध्ये स्थानिक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. महाजन कुटुंबाचा एकत्रित फोटो काढण्यासाठी चालक घोडागाडी थांबवून खाली उतरला होता, नेमका त्याच वेळी घोडा अचानक बिथरल्यामुळे गाडीतून खाली पडलेल्या आपल्या आईला वाचवण्यासाठी १८ वर्षीय रोमांच महाजन यानेही गाडीतून खाली उडी मारली, परंतु यावेळी त्याचे डोके जमिनीवर जोरात आदळले.

१५० वर्षांपूर्वी ही सेवा सुरु झाल्यापासून घोडागाडीशी संबंधित अपघातात झालेला हा पहिलाच मानवी मृत्यू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ८५० एकर क्षेत्रावर पसरलेल्या या उद्यानाचे व्यवस्थापन ‘सेंट्रल पार्क कन्झर्व्हन्सी’ पाहते.

चालक फोटो काढायला उतरला, घोडा उधळला

कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी घोडागाडी चालकाने गाडी थांबवली आणि तो खाली उतरला. नेमका त्याच क्षणी तो घोडा अचानक उधळला. घोडा वेगाने धावत फुटपाथवर चढला आणि गवताळ भागाकडे गेला; परिणामी घोडागाडीही त्याच्या मागे फरफटत गेली. घोड्याचा वेग प्रचंड वाढला होता आणि चालक त्याच्या मागे धावत होता, असे स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
Maharashtra TimesCrime News : दीड महिन्यांपूर्वी विवाह, डॉक्टर नवऱ्याची CCTV तून पाळत, शेजारणीशी बोलल्याचा जाब विचारला, अंबरनाथमध्ये नवविवाहितेचा गूढ अंत

आई खाली पडली, लेकाचा जीव घाबराघुबरा

“आम्ही ‘मदत करा, मदत करा!’ असे ओरडत होतो” असे रोमांचचे वडील दीपक महाजन यांनी सांगितले. कुटुंबातील सदस्य एकमेकांना घट्ट धरुन होते, पण जेव्हा प्रिया महाजन गाडीतून खाली पडल्या, तेव्हा तिला मदत करण्यासाठी १८ वर्षांचा मुलगा रोमांचनेही खाली उडी मारली, असे दीपक यांनी सांगितले. “केवळ आपल्या आईला वाचवण्यासाठी माझ्या मुलाने खाली उडी मारली” असे दीपक म्हणाले.

ऑपरेशन तुतारी? शरद पवारांचे आमदार फुटणार? उत्तम जानकर यांचं महत्त्वाचं विधान

“तो घोडा घाबरला आणि अतिशय वेगाने धावू लागला” असे ‘टॅव्हर्न ऑन द ग्रीन’मध्ये काम करणाऱ्या टॅटियाना ब्रेस्लर यांनी सांगितले. रोमांचचे डोके जमिनीवर आदळले आणि तो निपचित पडला. बुधवारी रात्री रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला, असे मूद करण्यात आले आहे. कुटुंबातील इतर सदस्य—वडील, आई आणि रोमांचचा धाकटा भाऊ—यांना किरकोळ दुखापत झाली आहे. घोडागाडीच्या घोड्यांशी संबंधित अपघातांच्या मालिकेतील ही सर्वात अलिकडील घटना आहे.

Maharashtra TimesPune News : लग्नासाठी 14 कोटींचा महाल बूक, पण त्याआधीच आक्रित; होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर ट्रेकिंग, पुण्यातील तरुणाचा वेदनादायी शेवट
घोडागाडी चालकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने म्हटले आहे की, ही घटना कधीच घडायला नको होती. “हे अस्वीकार्य आहे. चालकाने फोटो काढण्यासाठी गाडी सोडून जाणे अपेक्षित नाही – कधीच नाही. या अपघाताच्या सखोल चौकशीला आमचा पाठिंबा आहे.”

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा