Headlines

‘कच्चा आम’ वेब सीरिजची चर्चा, मराठमोळ्या दिग्दर्शकानं रील्सस्टार्सकडून असा करून घेतला अभिनय


Rohit Shilwant Director: ‘कच्चा आम’ या युट्यूब सीरिजची सध्या चर्चा सुरू आहे. सीरिजसोबत एक मराठमोळं नाव चर्चेत आलं ते म्हणजे रोहित शिलवंत .

Rohit Shilwant
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अदिती पवार, जे. पी लॉ कॉलेज

‘नथा है वह!’ या ‘टाइमपास’ चित्रपटातला संवाद सगळ्यांना आठवत असेल. तो संवाद म्हणणारा रोहित शिलवंत यानं त्याच चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. त्याचा प्रवास आता ‘धानक’, ‘मामला लीगल है’, ‘ग्राम चिकित्सालय ‘सारख्या हिंदी-मराठी कलाकृतींपर्यंत पोहोचला आहे. रोहितनं ‘कच्चा आम‘ या पाच भागांच्या यूट्यूब सीरिज माध्यमातून स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे .

Maharashtra TimesSunil Lahri : ‘वाईट कृत्य, भक्तांच्या श्रद्धेचा मोठा विश्वासघात’, अयोध्या राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर संतापले ‘रामायण’ फेम ‘लक्ष्मण’
रूपारेल कॉलेजमध्ये असताना रोहितची सुरुवात अभिनयातून झाली खरी; मात्र एकांकिका, लेखन आणि कथानक उभं करण्याच्या प्रक्रियेत तो अधिक रमत होता. त्यामुळे अभिनयापेक्षा दिग्दर्शन आणि लेखनाकडे त्याचा कल वाढत गेला. ‘टाइमपास’ नंतर त्यानं अनेक कलाकृतींसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. या प्रवासाविषयी तो म्हणाला, ‘२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचं मी दिग्दर्शन केलं. नागेश कुकुनूर यांच्या ‘धानक‘ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना मोठ्या कॅनव्हासवर सिनेमाकडे पाहण्याची दृष्टी मिळाली. ‘मामला लीगल है’, ‘ग्राम चिकित्सालय’ यांसारख्या सीरिजमध्येही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

Maharashtra TimesRuchita Jadhav: महाबळेश्वर, कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये १०० हून अधिक बंगले, मराठी अभिनेत्री कोट्यवधींचीं मालकीण, सांगितलं बिझनेस मॉडेल

टेक अ ब्रेक’च्या ‘ कच्चा आम ‘ सीरिजची संकल्पना माझ्याकडे आली, तेव्हा केवळ व्यक्तिरेखांची प्राथमिक रूपरेषा तयार होती. मां, मुन्ना आणि बबलू मामा या पात्रांच्या पार्श्वभूमीवर कलाकारांसोबत बसून सविस्तर काम केलं. त्यांच्या नातेसंबंधांमधूनच विनोद आणि भावविश्व उभं राहिलं.’

सीरिजच्या प्रक्रियेविषयी रोहित म्हणाला, ‘रील्समधून लोकप्रिय झालेल्या कलाकारांना सीरिजसाठी आवश्यक असलेले बारकावे आणि पॉझ समजावून सांगण्यासाठी सुरुवातीला कार्यशाळा घेण्यात आल्या. पहिल्या दोन दिवसांत कलाकारांनी ही लय पकडली आणि नंतर त्यांनी स्वत:ला सहज त्या माध्यमाशी जुळवून घेतलं. हिंदी भाषेतील या सोरिजला महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि नेपाळमधूनही प्रतिसाद मिळतोय. कथेवर कोणत्याही प्रदेशाचं लेबल न लावता विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रेक्षकांनी ती आपलीशी केली आहे.’ ‘कच्चा आम’ या पाच भागांच्या सीरिजला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता टीव्हीएफसाठी दिग्दर्शित केलेल्या पायलट एपिसोडवर आधारित सीरिजच्या लेखनाचं काम सुरू असून, त्यात प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत यांच्यासारखे मराठी कलाकार झळकणार असल्याची माहिती त्यानं दिली.

दिग्दर्शक म्हणून मी निर्माण केलेल्या विश्वाशी प्रेक्षक स्वतःला मनापासून जोडून घेत आहेत, यापेक्षा दुसरं कोणतंही पारितोषिक नाही. ‘कच्चा आम’ला मिळणारं प्रेम आणि कौतुक हे आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचं फलित आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा