Headlines

no one permanent here sudhir mungantiwar takes dig at cm devendra fadnavis ; मुख्यमंत्रिपदही येणार-जाणार, ‘पर्मनंट’ कुणीच नाही! सुधीर मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला


Sudhir Mungantiwar: चंद्रपूर जिल्ह्यातील दहा नगर परिषदा आणि एक नगरपंचायत अशा अकरापैकी केवळ दोनमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. भाजपच्या या पराभवानंतर पक्षाने योग्य बळ दिले नसल्याचा संताप मुनगंटीवार यांनी रविवारी व्यक्त केला होता.

fadnavis mungantiwar
fadnavis mungantiwar(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: मला जेव्हा जेव्हा शक्ती दिली, तेव्हा तेव्हा मी कामाच्या माध्यमातून पक्षाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी काम केले. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराज कशाला असेल? नाराजी जनतेत असेल. मंत्रिपद येते आणि जाते. मुख्यमंत्रिपद ज्यांचे आहे, त्यांचेही येणार आणि जाणार आहे. ‘पर्मनंट’ कुणीच नाही, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला लगावला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी, महापालिका निवडणुकीत मुनगंटीवार यांना आवश्यक सर्व बळ दिले जाईल, असे सांगितले होते. सोमवारी माध्यमांशी बोलताना पुन्हा मुनगंटीवार यांनी पुन्हा पक्षनेतृत्वावर टीका केली.

काँग्रेसची त्यांच्या नेत्यांना शक्ती, पक्षाने माझी ताकद कमी केली; मुनगंटीवारांचे भाजपवर ताशेरे

मुनगंटीवार म्हणाले, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे चारही जिल्हे भाजपच्या पाठीशी नेहमीच सक्षमपणे उभे राहिले आहेत. इतकी वर्षे कष्ट केल्यावरही विकासाचा अपेक्षित वेग दिसून येत नाही, ही या जिल्ह्यांमधील कार्यकर्त्यांची भावना आहे. छोट्याछोट्या गोष्टींचे निर्णय वेगाने होताना दिसत नाहीत. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसला. जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण तयार होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिला.

Maharashtra TimesChandrapur News : महाराष्ट्रातील कर्जासाठी शेतकऱ्याने विकलेल्या किडनीची सर्जरी कंबोडियात, १७ दिवस व्हिएतनामला कॉल सेंटरमध्ये नोकरी…धक्कादायक माहिती उघड
दरम्यान, मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा अपमान झाल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. मुनगंटीवार मंत्री असतानाही लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते, अशी पुस्तीही त्यांनी माध्यमांशी बोलताना जोडली.

मी नाराज नाही. मला कुठल्याही बळाची गरज नाही. मंत्रिपद हा विषय नव्हताच. योग्य वेळी, योग्य सल्ला देण्याची जबाबदारी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी आहे. कार्यकर्त्यांचा आवाज होण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ती व्यवस्थितपणे वठवतो. – सुधीर मुनगंटीवार, भाजपचे ज्येष्ठ नेते

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा