Multibagger Stock Rally News : शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक्स गुंतवणूकदार बारीक लक्ष ठेवून असतात. देशांतर्गत बाजारातील इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक एथर एनर्जीच्या शेअरने एकाच वर्षात जवळपास 240 टक्क्यांची शानदार वाढ नोंदवली आणि गुंतवणूकदारांना भक्कम परतावा दिला.

Ather Energy असाच शेअर आहे. देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदारांच्या खिशात खळखळाट केलेल्या या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीचे शेअर्स जणू पैसा छापायची मशीन ठरले आहेत. गेल्या वर्षभरात या कंपनीने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर जवळपास साडेतीन लाख रुपयांचा परतावा दिला आहे.
Property Rights: नातेवाईकांची परवानगी न घेता Joint प्रॉपर्टी विकू शकतो का? वडिलोपार्जित मालमत्ता कशी विकायची? जाणून घ्या नियम
मल्टीबॅगर स्टॉकमध्ये तुफान तेजी
आदल्या दिवशी, सोमवारी, हा मल्टीबॅगर स्टॉक 1,082.50 रुपयांवर क्लोज झालेला तर, मंगळवार 30 जून रोजी, 1,139 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. बाजाराच्या सुरुवातीनंतर या स्टॉकमध्ये वाढीचा कल दिसून आला असून दुपारी 12:30 वाजता शेअर 3.72% वाढीसह 1,133.60 रुपयांवर व्यवहार करत होता, तर व्यवहारादरम्यान या स्टॉकने 1,142.80 रुपयांपर्यंत उसळी घेतलेली.
सहा महिन्यात 50 टक्के परतावा
मागील काही दिवसांपासून या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये तेजीचा कल कायम राहिला आहे. मागील एका महिन्यात या शेअरने 20 टक्के उसळी घेतली तर, केवळ सहा महिन्यांत 50 टक्के परतावा दिला. म्हणजे या सहा महिन्यात एक लाखांची गुंतवणूक दीड लाख रुपये झाली असेल.
Gold-Silver Crash: चांदीच्या दरांनी मान टाकली तर सोन्यात स्वस्ताईचा धमाका; सराफा बाजारातील नव्या ट्रेंडने खळबळबळ, 30 जूनला Rates काय?
एका वर्षात केली पैशांची बरसात
त्याचप्रमाणे एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव केला. एक वर्षांपूर्वी शेअरची किंमत 332 रुपयांवर व्यवहार करत होती, म्हणजे या काळात या मल्टीबॅगर शेअरने 240 टक्क्यांची उसळी घेतली आहे. एका वर्षापूर्वी तुम्ही या शेअरमध्ये 1,00,000 रुपये गुंतवले असतील तर, आज तुमची गुंतवणूक अंदाजे 3.40 लाख झाली असेल.
Petrol-Diesel Rule Change: पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवरील मर्यादा पूर्णपणे रद्द; 1 जुलैपासून संपूर्ण देशात होणार बदल, दिवसाला 200 लिटरची मर्यादा होती
इतकेच नाही तर संपूर्ण आर्थिक वर्षात एथर एनर्जी लिमिटेडच्या स्टॉकने लक्षणीय कामगिरी केली आहे. या दरम्यान, कंपनीने 2,62,942 इलेक्ट्रिक दुचाकीची विक्री केली, जी 2025 च्या तुलनेत 69 टक्के जास्त आहे. तसेच या काळात कंपनीचा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत 66% वाढून 3,823 कोटी रुपये कमावले, जो आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक महसूल आहे.
(Disclaimer : वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यास लेखक किंवा महाराष्ट्र टाइम्स व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.)

