Ratnagiri Mandangad Young Man Died on the Spot Terrible Accident while going to his Brother Wedding; भावाच्या लग्नाला जाताना काळाची झडप, बाईक चालवताना झोपेची डुलकी; भीषण अपघातात युवकाचा करुण अंत
Ratnagiri Mandangad Young Man Died on the Spot Terrible Accident while going to his Brother Wedding; भावाच्या लग्नाला जाताना काळाची झडप, बाईक चालवताना झोपेची डुलकी; भीषण अपघातात युवकाचा करुण अंत
Ratnagiri Accident News : रत्नागिरीतील मंडणगड येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आपल्या भावाच्या लग्नाला जाताना मोठ्या भावाचा मृत्यू झाला आहे. बाईक चालवताना झोपेची डुलकी लागल्याने हा अपघात झाला आहे.
रत्नागिरी लग्नाला जाताना भावाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : दुचाकी चालवताना किंवा चारचाकी चालवताना आपल्याला झोप आल्यास गाडी योग्य ठिकाणी थांबवून विश्रांती घेणं अत्यावश्यक आहे, अन्यथा एक डुलकीही जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पालघर कुंबळे राज्य मार्गावर झालेल्या भीषण अपघातात घडली आहे. 35 वर्षीय युवकाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली. कल्पेश प्रकाश आदावडे (वय 35, मूळ रा. मानेवाडी चिखलगाव, ता. दापोली) असं मृत्यू झालेला युवकाचे नाव आहे. कल्पेश आपल्या भावाच्या लग्नासाठी दुचाकीवरून गावी येत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश आदावडे हे आपल्या भावाच्या आज मंगळवारी होणाऱ्या लग्नासाठी 18 एप्रिलला म्हणजे शनिवारी मध्यरात्री सुमारास विरार येथून स्वतःच्या दुचाकीने गावी निघाले होते. प्रवासादरम्यान इंदापूर येथे त्यांनी सुमारे एक तास विश्रांती घेतली होती. मात्र, त्यानंतरच्या प्रवासात त्यांना वारंवार झोपेची डुलकी येत होती. काहीवेळ त्यांनी थांबून चेहऱ्यावर पाणी मारुन त्यांनी थकवा दूर करण्याचा प्रयत्न केला, पण थकवा पूर्णपणे दूर झाला नाही.
गाडी चालवताना डुलकी
मंडणगड तालुक्यातील चिंचाळी धरणाच्या पुढे, कुंभवे गावाच्या आधी, पुन्हा डुलकी लागल्याने त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन खड्ड्यात कोसळली. या अपघातात कल्पेश आदावडे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमी विलास मोहिते यांना बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. Latur Crime : कौटुंबिक वादाला कंटाळली, विवाहितेनं पोटच्या दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपवलं; एकाचवेळी मायलेकांवर अंत्यसंस्कार याप्रकरणी विलास मोहिते यांनी मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, झोपेची डुलकी येत असतानाही दुचाकी चालविणे, तसेच रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, घरात लग्नाचा आनंदाचा उत्सव असताना अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे आदावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त होत असून, या घटनेने परिसरात शोककाळा पसरली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा