Headlines

Nashik Shravani Patil Dies after Vaccination State Government Decides to Stop Diphtheria and Tetanus Vaccines; लसीकरणानंतर 17 वर्षीय मुलीचा मृत्यू, लेकीचा चेहरा बघून आईचा काळीज चिरणारा आक्रोश; घटनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय


Nashik Girl Dies After Vaccination : नाशिकमध्ये लसीकरणानंतर एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आता नेमका मृत्यू कशामुळे झालाय? याचा उलगडा व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच कळणार आहे.

Nashik Girl Dies After Vaccination
नाशिक लसीकरण श्रावणी पाटील मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहरातील कामटवाडे भागात ‘धनुर्वात आणि घटसर्प’ लशीचा बूस्टर डोस घेतल्यानंतर श्रावणी पाटील (वय १७) या मुलीचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डिप्थीरिया आणि टिटानस या औषधांच्या ठरावीक बॅचवर आता संपूर्ण राज्यात तातडीने बंदी घातली आहे. राज्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांना लस वापरू नये, अशी सूचना जारी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवले

राज्यात या विशिष्ट बॅचच्या एकूण १,६३२ लस बाटल्या वितरित केल्या होत्या. त्यापैकी १,३६० बाटल्यांचा वापर झाला आहे. मात्र, नाशिकमधील गंभीर घटनेनंतर उर्वरित २७२ बाटल्या तत्काळ परत मागवण्यात आल्या आहेत. तसेच लस देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट सिरिंज, इंजेक्शनच्या एकूण १ लाख ३७ हजार ६०० इंजेक्शन वितरित झाली. त्यापैकी १ लाख ११ हजार २०० इंजेक्शनचा वापर झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि तपासणीसाठी सुमारे ८०० नमुने केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कसौली (हिमाचल प्रदेश) येथे पाठवण्यात आले आहेत. श्रावणीला ज्या बाटलीतून डोस देण्यात आला, त्याच बाटलीतून अन्य पाच जणांनाही डोस देण्यात आला होता. मात्र, त्या पाचही जणांवर विपरीत परिणाम झालेला नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी लस आणि इंजेक्शन या दोन्ही घटकांचे नमुने कसौली येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
Maharashtra TimesNashik Traffic Updates : नाशिकमध्ये संत निवृत्तिनाथ महाराज पालखी मार्गात बदल, द्वारकाऐवजी ट्रॅक्टर हाऊसमार्गे जाणार; शहरातील पालखीमार्ग वाचा सविस्तर

तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रियेमुळे मृत्यू?

श्रावणी पाटील हिचा मृत्यू तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रियेमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने काढला आहे. धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लशीनंतर श्रावणीचा मृत्यू झाला किंवा कसे याचे सविस्तर कारण शोधण्यासाठी मुलीच्या त्वचेचे, रक्ताचे नमुने; तसेच व्हिसेरा नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

नेमकी घटना काय?

कामडवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ जून रोजी १२ वाजून ४० मिनिटांनी श्रावणीला धनुर्वात व घटसर्प प्रतिबंधक लस देण्यात आली. घरी जात असताना चक्कर येऊन ती खाली कोसळली. पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले, नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. तिचा मृत्यू तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रियेमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने काढला. तसेच ज्या व्हायलमधून श्रावणीला लशीचे इंजेक्शन दिले होते, त्यातील शिल्लक लशीचे नमुनेही तपासणीसाठी हिमाचल संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. या लशीमध्ये काही दोष तर नाही ना, याचा तपास केला जात आहे.
Maharashtra TimesAshadhi Ekadashi 2026 : वारी चुकायाची नाही! निवृत्तिराया निघाले पांडुरंगा भेटी; कपाळी गंध-बुक्का, डोईवर तुळस, हाती टाळ, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान

…असा आहे प्राथमिक निष्कर्ष

धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस दिल्यानंतर लाखातील काही जणांमध्ये ॲलर्जिक प्रतिक्रिया दिसून येते. काही लोकांमध्ये ती अधिकर तीव्र असण्याची शक्यता असते. श्रावणीला अशाप्रकारे तीव्र ॲलर्जी झाली असावी. त्यातून ती चक्कर येऊन कोसळल्याने मेंदूला मार लागला, असा निष्कर्ष जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखालील ‘एईएफआय’ समितीच्या बैठकीत काढण्यात आला. पालकांच्या म्हणण्यांनुसार, श्रावणीच्या त्वचेवरही ॲलर्जी दिसून आली होती. त्यामुळे शवविच्छेदन केल्यानंतर रक्ताबरोबरच त्वचेचे नमूनेही घेण्यात आहे. ‘व्हिसेरा’सह नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा