Headlines

8th Pay Commission Fitment Factor Salary Hike Calculator; पगारवाढीच्या नावाखाली अपेक्षांवर पाणी फिरेल; किमान ₹69000 वेतन स्वप्नच, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना सरकारचा देणार झटका?


8th Pay Commission Fitment Factor: आठव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा धक्का बसायची शक्यता आहे. आयोग सुमारे 2.57 च्या फिटमेंट फॅक्टरची शिफारस करण्याची शक्यता आहे परिणामी, कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार नाही.

8th Pay Commission Fitment Factor Calculator
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Central Govt Employees: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्स आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत वेतन आयोगाकडून फिटमेंट फॅक्टरबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, पण आठव्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.

फिटमेंट फॅक्टर काय असू शकतो?

आठवा केंद्रीय वेतन आयोग, 7व्या वेतन आयोगाप्रमाणेच, सुमारे 2.57 च्या फिटमेंट फॅक्टरची शिफारस करू शकतो. केंद्र सरकार सध्या कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या आर्थिक परिणामांचे मूल्यांकन करत असून फिटमेंट फॅक्टरबद्दल मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. आतापर्यंत कर्मचारी संघटनांनी वेतन आयोगासमोर आपल्या वेगवेगळ्या मागण्या मांडल्या, ज्यामध्ये 3 पेक्षा जास्त फिटमेंट फॅक्टरची मागणी केली गेली आहे. पण यावेळी केंद्र सरकार 2.86 फिटमेंट फॅक्टर निश्चित करू शकते.
Maharashtra TimesGold-Silver Crash: चांदीच्या दरांनी मान टाकली तर सोन्यात स्वस्ताईचा धमाका; सराफा बाजारातील नव्या ट्रेंडने खळबळबळ, 30 जूनला Rates काय?
फिटमेंट फॅक्टर सुधारित मूळ वेतन आणि निवृत्तीवेतन मोजण्यासाठी वापरला जाणारा मानक आहे. फिटमेंट फॅक्टर प्रत्येक वेतन आयोगाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो, कारण यावरून केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या पगार आणि पेन्शन वाढ निश्चित होते.

सरकार सावधगिरी बाळगण्याची शक्यता
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार सुरुवातीच्या चर्चांमधून केंद्र आणि राज्य सरकारांवरील आर्थिक भार लक्षात घेता आयोग सावध भूमिका घेऊ शकते. सध्या ही प्रक्रिया फिटमेंट फॅक्टरच्या संभाव्य व्याप्ती, राज्य सरकारांशी सल्लामसलत करण्यावर आणि सुधारित वेतन व निवृत्तीवेतन रचनेच्या आर्थिक परिणामाचे मूल्यांकन करण्यावर केंद्रित असल्याचे, या चर्चेची माहिती असलेल्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. अशा परिस्थितीत, आयोगाच्या अंतिम शिफारशींमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांवरील आर्थिक परिणाम महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
Maharashtra TimesPetrol-Diesel Rule Change: पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवरील मर्यादा पूर्णपणे रद्द; 1 जुलैपासून संपूर्ण देशात होणार बदल, दिवसाला 200 लिटरची मर्यादा होती

2.86 फिटमेंट फॅक्टरनुकसार किती वाढणार पगार

सध्याचे मूळ वेतन 2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार नवीन मूळ पगार
18,000 51,480
19,900 56,914
21,700 62,062
25,500 72,930
29,200 83,512
35,400 1,01,244
44,900 1,28,414
56,100 1,60,446

कर्मचारी संघटनांची मागणी काय

  • कर्मचारी संघटनांची 3.83 फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव दिला आहे.
  • कर्मचाऱ्यांच्या निवेदनानुसार मागणी मान्य झाल्यास किमान मूळ पगार 69000 रुपयांपर्यंत वाढेल
  • मात्र, सरकारने मागणी नाकारली आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 च्या आसपास ठेवला, तर 69000 रुपयांच्या किमान मूळ वेतनाचे स्वप्न भंगू शकते.

Maharashtra TimesCash At Home: घरात 100-200 रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात; लोकांची सवय अचानक का बदलली? करोनाशी कनेक्शन
त्याचप्रमाणे, आठवा वेतन अयोग्य निवेदन तसेच राज्य सरकारांकडून मिळालेल्या अभिप्रायाचा अभ्यास करेल. उत्तर प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालपासून विचारविनिमयाची पुढील फेरी सुरू होईल तर याआधी यापूर्वी दिल्ली, लडाख, जम्मू आणि काश्मीर, तेलंगणा, महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांमध्ये विचारविनिमय आयोजित केले गेलेले.

अशाप्रकारे, सगळे विचारविनिमय पूर्ण झाल्यावर आयोग अंतिम अहवाल तयार करेल, ज्यामध्ये केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी सुधारित वेतन व निवृत्तीवेतन रचना सादर केली जाईल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा