Vishwas Satim Death : ‘रविवारी दुपारी फोन करुन घरी जेवायला येणार की नाही ते कळवतो’ असे विश्वासने ट्रेकसाठी निघताना आईला सांगितले होते. परंतु पहाटे ३.३० वाजता त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पुण्यातील राजगड ट्रेकसाठी निघालेल्या खासगी मिनी बसला पाबे घाटात झालेल्या भीषण अपघातात विलेपार्ले पश्चिम, नेहरुनगरमध्ये राहणाऱ्या विश्वास सातिम (२५) याचा मृत्यू झाला. क्रिकेटची प्रचंड आवड, मनमिळाऊ स्वभाव आणि मित्र परिवारात लोकप्रिय असलेल्या विश्वासच्या अचानक झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बस अपघातात दोघांचा मृत्यू
रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पाबे घाटातील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने, मिनी बस संरक्षक कठडा तोडून ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. ट्रेकसाठी निघालेल्या या बसमध्ये सीप्झमधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र विश्वासला वाचवता आले नाही.
कुटुंबीयांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘रविवारी दुपारी फोन करुन घरी जेवायला येणार की नाही ते कळवेन,’ असे विश्वासने ट्रेकसाठी निघताना आईला सांगितले होते. मात्र पहाटे ३.३० वाजता त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला आणि विश्वास अपघातात जखमी झाल्याचे समजले. त्यानंतर सकाळी ८ वाजता त्याच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
विश्वासचे मूळ गाव संदेरी (जिल्हा रायगड). लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची विशेष आवड होती. विविध स्पर्धांमध्ये तो नियमित सहभागी होत असे. नोकरी करतानाही, वेळ मिळेल तेव्हा मित्रांसोबत क्रिकेट खेळणे हा त्याचा विरंगुळा होता. अत्यंत मनमिळावू अशी त्याची मित्र मंडळींमध्ये ओळख होती. त्यामुळे त्याच्या निधनाच्या बातमीमुळे मित्र परिवार आणि नातेवाइकांना मोठा धक्का बसला.
बस कोसळत असताना उलटल्यामुळे सर्व प्रवासी सीट खाली अडकले. फिर्यादींनी ११२ क्रमांकावर फोन केला. खबर मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी क्रेन आणल्यावर रात्री अंधारात बचावकार्य सुरु करण्यात आले. बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. वेल्हे ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तिथे डॉक्टरांनी विश्वास सातिम याच्यासह सहकारी ध्वनी चंद्रेश ठक्कर (२३ रा. ओम पॅलेस, कांदिवली) यांना मृत घोषित केले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा