Digital Tax vs Donald Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचा बडगा उचलला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार अल्फाबेट इंक आणि मेटा प्लॅटफॉर्म्स इंक यांसारख्या अमेरिकेतील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांना अन्यायकारकपणे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे.

ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ धमकी
ट्रम्प यांना वाटतं की आपण कोणताही निर्णय असो, तो योग्यच असेल आणि अमेरिकेच्या हितासाठी कोणत्याही देशाविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ शकते. आपल्या नवीन सोशल मीडिया पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन IT कंपन्यांवर डिजिटल सेवा कर लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशासोबतचे व्यापार करार रद्द करण्याची धमकी दिली. अमेरिकन आयटी कंपन्यांवर जो कोणता देश डिजिटल टॅक्स लागू करेल, त्याला 100 टक्के शुल्काचा सामना करावा लागेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले.
Delayed Possession: घराचा ताबा दिला म्हणजे ग्राहकांचे अधिकार संपले का? बिल्डर लॉबीला सुप्रीम कोर्टाने सुनावलं! नक्की काय घडलं
डिजिटल सेवा कर म्हणजे काय?
ऑनलाइन जाहिरात, डिजिटल बाजार आणि वापरकर्त्यांच्या डेटा वापराद्वारे महसूल मिळवणाऱ्या कंपन्यांवर डिजिटल सेवा टॅक्स लादला जातो. युरोपियन देशांनी डिजिटल सेवा कर लादला असून काहींनी प्रस्तावितही केले आहेत. IT क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी ज्या देशांमध्ये महसूल मिळवतात, त्यांनी आपल्या देशात कर भरण्याचा यामागचा उद्देश आहे.
अनेक अमेरिकन कंपन्यांवर संभाव्य कर दायित्वाचा हवाला देत अमेरिकेने अशा निर्णयाला सातत्याने विरोध केला असून गूगल, मेटा, ॲपल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्या या प्रकारच्या व्यवसायातून मोठा नफा कमावतात.
Bank Holidays July 2026: जुलैमध्ये 12 दिवस बँकांचे कामकाज बंद पडणार; सुट्ट्यांची यादीच पाहूनच कामाचे प्लॅनिंग करा
ब्रिटन-फ्रान्सने केलेला प्रयत्न
जी7 परिषदेच्या बैठकीत सामील होण्यासाठी फ्रान्सला रवाना होताना देखील ट्रम्प यांनी याआधीही असाच इशारा दिला होता. पण ट्रम्प यांच्या अलीकडच्या वक्तव्यानंतर जागतिक व्यापारातील तणाव वाढू शकतो. या कृतींमुळे अमेरिकन कंपन्यांच्या हिताला बाधा पोहोचल्यास प्रभावित देशांना 100% शुल्काचा सामना करावा लागेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितलेले. ब्रिटन आणि फ्रान्सने यापूर्वीही असाच उपाय करण्याचा प्रयत्न केला होता.
या वर्षाच्या सुरुवातीला ब्रिटनने अमेरिकन टेक कंपन्यांवर 2% डिजिटल कर लादला, परिणामी अमेरिकेने शुल्क लावण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे फ्रान्सनेही अमेरिकन कंपन्यांवर डिजिटल कर लावण्याबद्दल चर्चा केली होती, ज्यामुळे फ्रेंच वाईनवर 100% टॅरिफ लादण्याचा इशारा दिला.
Stock Market Crash: भावांचा विषय लय हार्ड! दोघांनी नोकऱ्या बदलल्या अन् अनेक देशांचे शेअर बाजार हादरले; ‘ते’ नेमके कोण?
भारतानेही लादलेला डिजिटल टॅक्स
ब्रिटन आणि फ्रान्सप्रमाणे एकेकाळी भारताने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स कंपन्यांवर 2% कर व ऑनलाइन जाहिरातींमधून महसूल मिळवणाऱ्या गूगल व फेसबुकसारख्या कंपन्यांवर 6 टक्के डिजिटल कर लादण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, हा प्रस्ताव नंतर मागे घेतला गेला आणि भारताने OECD ने प्रस्तावित द्विस्तंभीय उपायाचा अवलंब करण्याचा आग्रह धरला, ज्याचा उद्देश द्विपक्षीय वाटाघाटींद्वारे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून टॅक्स गोळा करण्याचा होता.

