Nashik News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ‘उबाठा’चे सहा खासदार फोडल्यानंतर ‘उबाठा’नेही आपली नीती बदलली आहे. ते शिंदेसेनेच्या उमेदवाराविरोधात मतदान करणार असल्याची माहिती समोर येत आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी आज (दि. १८) मतदान होत असून, नाशिकमध्ये दोन अपक्ष उमेदवारही मतपत्रिकेवर असल्यामुळे महायुतीच्या नरेंद्र दराडेंच्या विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत फिल्डींग लावण्याचे काम सुरू आहे. अपक्षांमुळे नेत्यांना साशंकता कायम असून, दगाफटका टाळण्यासाठी ठाण्याहून रात्रीत उमेदवारांना नजरकैदेत नाशिकमध्ये आणले जाणार आहे. तर दुसरीकडे ‘उबाठा’च्या फुटीनंतर महाविकास आघाडीने व्यूहरचना बदलत आपली शिंदेंच्या विरोधात आपली शंभर मते अपक्षाच्या पदरात टाकली जाणार असल्याने महायुतीची धाकधूक अधिकच वाढली आहे.
विधानपरिषदेत महाविकास आघाडीकडे शिवसेना ‘उबाठा’चे ४५, काँग्रेसचे १३ आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष मिळून ९७ मतदार आहेत. आतापर्यंत तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ‘उबाठा’चे सहा खासदार फोडल्यानंतर ‘उबाठा’नेही आपली नीती बदलली असून, शिंदेसेनेच्या उमेदवाराविरोधात मतदान करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही मतदान करणार, पण शिंदेसेनेच्या उमेदवाराला करणार नाही असे स्पष्टीकरण उपनेते दत्ता गायकवाड यांनी दिले. त्यामुळे अपक्षाच्या पाठीशी ९७ मतदारांचे बळ उभे राहिल्याने शिंदेसेनेची धाकधूक वाढली आहे. Lok Sabha Majority : 320 पर्यंत जाणार आकडा, तरी लोकसभेत पडणार तोकडा? डबल फुटीनंतरही ‘नंबर’साठी कंबर कसावी लागणार, चार पक्षांवर मदार
तीन खासदार ठाकरेंसोबत
शिवसेनेचे (उबाठा) लोकसभेत नऊ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रता टाळण्यासाठी यातील किमान सहा खासदारांनी एकाच वेळी पक्षांतर करणे आवश्यक आहे. सावंत आणि देसाई यांच्याव्यतिरिक्त नाशिकचे खासदार राजाभाऊ ऊर्फ पराग वाजे हे या संकटात पक्षाबरोबर ठाम उभे राहिल्याचे चित्र असून, राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेलाही वाजे उपस्थित होते. ‘आपण ठाकरे यांना सोडून कोणाबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. ‘शिंदे गटाचे काही लोक आपल्या घरी सिन्नरला आले होते. त्यांनाही आपण हेच सांगितले’, असेही वाजे म्हणाले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा