पोलिसांच्या माहितीनुसार, ८ वर्षीय विद्यार्थीनी आणि दोन आरोपी विद्यार्थी हे बाबुलगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीतील विद्यार्थी आहेत. याच महिन्यात १ तारखेला ही घृणास्पद घटना घडली. ज्या विद्यार्थ्यांनी हा गुन्हा केला त्यांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. घटनेच्या काही दिवसांनंतर पीडित विद्यार्थीनीने तिच्या गुप्तांगात दुखत असल्याचे तिच्या पालकांना सांगितले होते.
Crime Diary: राखी बांधून घेतली, मग बहिणीचे केस कापून गळा दाबला, बॉयफ्रेंडलाही संपवलं; भावाचा निर्लज्जपणा
पीडितेच्या पालकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले असता हा प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या गुप्तांगात इजा झाल्याचे सांगितले, असेही पोलिसांनी नमूद केले. या घटनेमुळे शाळेसह परिसरातील सर्वच लोक हादरले आहेत.
पोलिसांनी पुढे सांगितले की, पीडितेच्या आईने या घटनेबाबत तक्रार दाखल केली. विद्यार्थीनीने तिच्या आईला दोन विद्यार्थ्यांनी शाळेच्या टॉयलेटमध्ये दुसऱ्या मुलीच्या मदतीने तिच्यावर अत्याचार केला, असे तिने सांगितले. पण पीडितेची आईने ९ ऑगस्ट पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांचीही बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
रायगडमधून देखील अशीच एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. एका पाच वर्षीय मुलावर पंधरा वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने त्या पाच वर्षी मुलाला एका झाडी ठिकाणी गेला आणि तेथे त्याच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. यामुळे मुलाच्या गुप्तांगाला इजा झाली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रकिया सध्या सुरुच आहे.

