Headlines

Nashik Crime: लोंढे, पाटणकरचा कारागृहात उच्छाद; एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांविरुद्ध खोटा अर्ज, प्रकरण काय? – londhe-patankar wreaks havoc in prison attempted killed of individual and filing of false complaint against police


Nashik Crime: पोलिसांची नोकरी घालवून खोटे अर्ज करण्यासह शहराचा ‘बॉस’ बनण्याचे स्वप्न पाहत संशयितांनी कारागृहातही गुंडगिरी केली.

crime
नाशिक क्राईम बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: खुनाच्या प्रयत्नासह संघटित गुन्हेगारीअंतर्गत दाखल गुन्ह्यात कारागृहात असलेला संशयित दीपक लोंढे व गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्यासह कारागृहात असलेल्या एका संशयिताला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महेश सोनवणे उर्फ चिमण्या याच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध नाशिकरोड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

सातपूर येथील महेश गोकुळ सोनवणे उर्फ चिमण्या (वय २३) याला अंबड पोलिसांत दाखल गुन्ह्यात ‘मोक्का’अंतर्गत गुन्ह्यात ३१ जानेवारीला अटक झाली होती. त्याच्या फिर्यादीवरून संशयित दीपक उर्फ नाना लोंढे, हर्षद पाटणकर आणि वकील यतिश देसले याच्याविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिमण्या हा १० जून रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या जामिनानुसार कारागृहाबाहेर आला आहे. त्याला १५ जून रोजी चाप्टर कारवाईसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोलावले होते. तिथे अधिकाऱ्यांनी चिमण्याच्या नावाने कारागृहातून आलेला एक अर्ज वाचायला दिला. अर्ज पाहताच चिमण्याने हा अर्ज ‘मी लिहिलाच नसून, जेलमध्ये असताना काही संशयितांनी गळा दाबून, जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतली आणि त्याचा हा गैरवापर केला’, असा जबाब दिला.

Maharashtra TimesUddhav Thackeray : सहा खासदार फुटले, विधान परिषदेसाठी ठाकरेंनी रातोरात रणनीती बदलली, शिंदेसेनेला पाडण्यासाठी नवी व्यूहरचना
पोलिसांची नोकरी घालवू
चिमण्या व पाटणकर हे एकाच टोळीचे सदस्य असून, दोघेही एकाच गुन्ह्यात कारागृहात होते. त्यावेळी संशयित हर्षद पाटणकर हा चिमण्याला भेटला . ‘तू अंबडच्या गुन्ह्यात माझ्याविरुद्ध मोक्का लावण्यासाठी मोठ्या अधिकाऱ्यांसमोर जबाब का दिलास? तू माझ्याशी पंगा घेतला आहेस. मी तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी पाटणकरने चिमण्याला दिली. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाटणकर आणि दीपक लोंढे यांना चिमण्यासोबतच्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले. त्यावेळी ‘आम्हाला वकील यतिश देसले यांनी पोलिसांविरुद्ध एक अर्ज लिहून दिला. त्यावर तुला सही करावी लागेल’,असे दीपकने चिमण्याला सांगितले. त्याबाबत चिमण्याने नकार दिल्यावर ‘या गुन्ह्याचा तपास सहाय्यक आयुक्त सचिन बारी, अंबडचे वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंह राजपूत हे करत असून त्यांच्याविरुद्ध आपल्याला कोर्टात खोटा अर्ज करायचा आहे. पोलिसांनी तुला धमकी देऊन जबाब घेतला, असे अर्जात लिहून तो वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रात पसरवायचा आहे. पोलिसांची बदनामी करून, खोट्या तक्रारी करून त्यांच्या नोकऱ्या घालवून धडा शिकवायचा आहे. हे केल्यास मोक्कातून सुटका होईल आणि जामीन मिळणे सोपे होईल, असे देसले वकिलाने सांगितले आहे. कारागृहातून बाहेर आल्यावर आपणच नाशिकचे ‘बॉस’ असू’, असे संशयित चिमण्याला म्हणाले होते.

Maharashtra TimesNashik Water Cut : जून-जुलैत दर शनिवारी, तर ऑगस्टमध्ये दोन दिवसाआड पाणीकपातीचा निर्णय
आज तुझी विकेट…
चिमण्याने अर्जावर सही करण्यास नकार दिल्याने संशयितांनी कारागृहात पाठलाग केला. सायंकाळी बराक बंद होण्यापूर्वी संधी साधून हर्षद आणि दीपक यांनी चिमण्याला गाठून ‘आज तुला जिवानिशी मारून तुझी विकेट घेतो’, असे म्हणत खाली पाडले. लोंढेने चिमण्याचे पाय धरून पाटणकरने दोन्ही हातांनी त्याचा गळा दाबला. जीव गुदमरल्याने मृत्यूच्या भीतीने चिमण्याने स्वाक्षरी करण्यास होकार दिला, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर वकील देसलेने बनावट अर्ज न्यायालयात आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे सादर केला. त्या अर्जामध्ये ‘पोलिसांनी महेश उर्फ चिमण्या याच्यावर फायरिंग केली आणि त्यांना मारहाण केली’, असे खोटे व गंभीर आरोप केले होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा