Headlines

Jasmine Sandlas Trolled For 3 Hours Delay And Li Sync In Concert ; Jasmine Sandlas : 8 च्या कार्यक्रम रात्री 11.20 ला सुरू, शिवाय गाण्याच्या नावाखाली नुसती लिपसिंक! धुरंधर फेम गायिका जस्मिन सँडलासवर फसवणूकीचे आरोप


Jasmine Sandlas Troll : हैदराबादमधील एका कॉन्सर्टमध्ये गायिका जस्मिन सँडलासवर टीका झाली. ती तीन तास उशिरा पोहोचली आणि त्यानंतरही तिने सादरीकरणादरम्यान ‘लिप-सिंक’ केले असा तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी दावा केला आहे.

jasmin sandlas
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या एका कॉन्सर्टनंतर गायिका जॅस्मिन सँडलासवर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांनी निराशा व्यक्त केली आहे. चाहत्यांचा आरोप आहे की, गायिका नियोजित वेळेपेक्षा जवळपास तीन तास उशिरा स्टेजवर आली आणि तिने परफॉर्मन्सदरम्यान काही ठिकाणी ‘लिप-सिंक केली. जॅस्मिनने 27 जून रोजी हैदराबादच्या ‘क्वेक एरिना’ मध्ये सादरीकरण केले पण या कॉन्सर्टची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. त्यानंतरच्या काही तासांत, कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या लोकांच्या संमिश्र प्रतिक्रियांचा सोशल मीडियावर पूर आला.

ही नाराजी केवळ परफॉर्मन्सपुरती मर्यादित नव्हती; अनेक सोशल मीडिया युझर्सनी कार्यक्रमाच्या आयोजकांवरही टीका केली. त्यांनी अपुरा संवाद, मोठा विलंब आणि संपूर्ण कार्यक्रमाचे चुकीचे व्यवस्थापन केले असे आरोप करण्यात आले. काहींनी लोकांची फसवणूक करण्याचा एक नवीन मार्ग” असेही म्हटले.

गायिकेवर टीका

एका सोशल मीडिया युझरने लिहिले, “मी तिची खूप मोठी फॅन होते, पण आता मी खरोखरच निराश झाले आहे!! शो रात्री 8 वाजता सुरू होणार होता, पण जॅस्मिन सँडलास, तू 11.20 वाजता आलीस आणि त्याबद्दल ना काही स्पष्टीकरण दिले ना माफी मागितली? तब्बल तीन तासांचा विलंब! आणि वरून तू येऊन ‘लिप-सिंक’ करतेस, खरंच, एका लाइव्ह शोमध्ये हे योग्य आहे का? त्यानंतर ‘थँक्यू’, ‘सॉरी’ किंवा काहीही न म्हणता तू अचानक निघून गेलीस.”

Maharashtra TimesTharala Tar Mag : अस्मिताच्या मेहनतीवर पाणी, पहिल्याच दिवशी गेला जॉब; सायलीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या प्लॅनिंगला नागराजचा लेक लावणार गालबोट

जस्मिन सँडलासच्या कॉन्सर्टमधील वाईट अनुभव

एका व्यक्तीने सांगितले, “अतिशय वाईट अनुभव! आम्ही रात्री 8 ते 11.30 पर्यंत वाट पाहिली आणि नंतर निघून गेलो कारण आम्हाला परत खूप लांबचा प्रवास करायचा होता. कार्यक्रमाला उशीर का होत आहे, याबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नाही. मॅनेजमेंट टिमचे वर्तन अत्यंत उद्धट आणि संतापजनक होते. ‘क्वेक’ इव्हेंट्स कशा प्रकारे फसवणूक करणारे आणि निकृष्ट दर्जाचे असतात, याबद्दल लोकांना सावध केले पाहिजे. खरंच, खूप वाईट अनुभव आणि अत्यंत खराब व्यवस्थापन!”

जास्मिन सँडलासवर टीका केली

सोशल मीडियावरील एका वापरकर्त्याने याला “सुपर फ्लॉप शो” म्हटले, तर दुसऱ्याने लिहिले, “अत्यंत निराशाजनक अनुभव. कार्यक्रम रात्री 8 वाजता सुरू होण्याऐवजी 11 नंतर सुरू झाला. ती अक्षरशः नंतर गायबच झाली… शिवाय ‘क्वेक’चे व्यवस्थापन तर सर्वात वाईट… जेवणाच्या सेवेव्यतिरिक्त अतिरिक्त ‘कव्हर चार्जेस’ म्हणजे ते विनाकारण फक्त पैसे उकळत होते… मी यापूर्वी क्लब कॉन्सर्टला गेलो आहे, पण हा अनुभव खरोखरच सर्वात वाईट होता.”

Maharashtra TimesAnuj Prabhu : झी मराठी अवॉर्डनंतर पार्किंगवाल्याने कारची चावी हरवली, त्रासलेल्या अनुज प्रभूची थेट देवालाच तंबी, दुसऱ्या दिवशी चमत्कार

जास्मिन सँडलास कोण आहे?

जास्मिन सँडलासबद्दल बोलायचे झाल्यास तिचा जन्म जालंधरमध्ये झाला आणि ती कॅलिफोर्नियामध्ये लहानाची मोठी झाली. तिने 2008 मध्ये “मुस्कान” या गाण्याने आपल्या गाण्यातील कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर बोहेमियासोबत “गुलाबी” या अल्बमवर काम केले.

मोनिकाच्या नवऱ्यानं ‘ठरलं तर मग’ मालिकेतील तिच्या नवऱ्याला काय सल्ला दिला?

जास्मिन सँडलासची गाणी

जास्मिनने सलमान खानच्या ‘किक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील तिचे “यार ना मिले” हे गाणे प्रचंड गाजले. त्यानंतर तिने स्ट्रीट डान्सर ३डी मधील “इलीगल वेपन 2.0”, “तरस नी आया तुझको” (मुंज्या), “नशा” (रेड २), “आशिकन” (द बास्टर्ड्स ऑफ बॉलीवूड) आणि “पॉइझन बेबी” (थम्मा) यांसारखी अनेक हिट गाणी दिली. आदित्य धर आणि रणवीर सिंग यांच्या ‘धुरंधर’ या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी तिने शीर्षक गीत आणि ‘शरारत’ हे आयटम साँग गायले. या दोन्ही गाण्यासाठी तिचे भरपूर कौतुक झाले होते.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा