Headlines

Uday Samant: …तर राजीनामा देईन! गुणरत्न सदावर्तेंच्या आरोपावर उदय सामंत यांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?


Uday Samant On Gunratna Sadavarte: विधान परिषदेच्या मतदानानंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत सामंत म्हणाले की, ही निवडणूक राज्यभरात सर्वाधिक चर्चेची ठरली.

uday samant
उदय सामंत(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असून, राज्यातील सर्व ११ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी माझ्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करावी. जर दोषी आढळलो, तर मंत्रिपदासह राजकारणातूनही बाहेर पडण्यास तयार आहे, असे ठाम विधान सामंत यांनी केले आहे.

संपर्कप्रमुख म्हणून आपण या प्रक्रियेत सक्रीय होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि अन्य नेत्यांच्या प्रयत्नांमुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे मताधिक्याने विजयी होतील. काही गैरसमज निर्माण झाले असले तरी त्यांचे निरसन करण्यात आले आहे. महायुती विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Maharashtra TimesGirish Mahajan: संजय राऊत मानवी बॉम्ब! गिरीश महाजनांचा हल्लाबोल; नगरसेवकही सोडून जाण्याचा केला दावा
‘ऑपरेशन टायगर’च्या मोहिमेबाबत आम्हालाही उत्सुकता आहे. मात्र, विरोधकांकडून ज्या प्रकारच्या दाव्यांचा प्रचार केला जात आहे, त्यातून मोठी कृती घडेल असे वाटत नाही. भविष्यात विविध पक्षांतील लोक महायुतीत येऊ शकतात, असे सांगतानाच त्यांनी ठाकरे गटातील काही नगराध्यक्षांनी आधीच प्रवेश केल्याचे नमूद केले. रेल्वे कर्मचाऱ्यांना मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करताना ते म्हणाले, मराठी शिकविण्याची भूमिका घ्यावी. उर्मटपणा किंवा दादागिरीला स्थान नसावे. कोणालाही मारहाण करण्यापेक्षा त्यांना मराठी शिकविणे योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
Maharashtra TimesBala Nandgaonkar : ‘नेत्यांचे पक्षांतर हा मतदारांचा अपमान’, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची ठाकरे गटाच्या फुटीवर पहिली प्रतिक्रिया
‘भास्कर जाधव पक्षांतर करणार नाहीत’
भास्कर जाधव यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन स्वागतार्ह आहे. काळानुसार बदल स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र ते स्वतः पक्षांतर करतील, याबाबत आपण सहमत नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या आरोपांवर जोरदार पलटवार करताना सामंत यांनी, आरोप करण्यापूर्वी संपूर्ण कागदपत्रांचा अभ्यास करावा, असा सल्ला दिला. संबंधित जागेबाबत शासन आणि एमआयडीसीच्या पातळीवर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा