Headlines

Nagpur Crime: अंगावर तर्रीचे शिंतोडे उडाल्यानं डोक्यात सणक; तीन महिलांसह 7 जणांनी तरुणाला संपवलं, नागपुरात खळबळ


म. टा. प्रतिनिधी, नागपूर: अंगावर तर्रीचे शिंतोडे उडल्याने झालेल्या वादातून तीन महिलांसह सात जणांनी सशस्त्र हल्ला करीत युवकाची हत्या केली. यात युवकाच्या भावासह तिघे जखमी झाले. ही थरारक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भतरवाडा परिसरात घडली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

योगेश बिरसिंग शाहू (वय २७, रा. भगतनगर) असे मृताचे तर लोकेश शाहू (वय ३०), राजा खोमन शाहू (वय २४) व रोहित आतरकर (वय ३०) अशी जखमींची नावे आहेत.

शुभम राजेश पिलारे (वय २०), त्याचे वडील राजेश पिलारे (वय ५२), आई सरिता राजेश पिलारे, शिवानी राजेश पिलारे (वय २४), प्रफुल्ल सुरेश बांते (वय १८), शुभांगी सुरेश बांते (वय ४५) व महेश ऊर्फ मंगेश रहांगडाले (वय २०, रा. गुलमोहरनगर) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत.

Maharashtra TimesNagpur Crime: नागपुरात महिलेच्या जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न; VIDEO व्हायरल करायची धमकी देऊन 3 लाख उकळले, वर्गमित्रासह दोघांना अटक
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, योगेशविरुद्ध गुन्हे दाखल असून, गेल्या काही वर्षांपासून तो खासगी काम करायचा. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास योगेश व त्याचे मित्र राजा खोमन शाहू, रोहित आतरकर हे तिघे गॅस गोदाम परिसरातील नाश्त्याच्या दुकानावर गेले. येथे महेश हा आधीच त्याच्या चार मित्रांसह तेथे नाश्ता करीत होता. योगेशने पोहे घेतले. याचदरम्यान तर्रीचे शिंतोडे महेशच्या अंगावर उडाले. त्याने योगेशसोबत वाद घालायला सुरुवात केली. योगेशने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही महेश त्याला शिवीगाळ करीत होता. ‘पोलिस ठाण्यात जाऊ’, असे योगेश हा महेशला म्हणाला. त्यामुळे महेश संतापला. त्याने प्रफुल्लच्या मोबाइलवर संपर्क साधून नाश्त्याच्या दुकानावर बोलवून घेतले. प्रफुल्लही तेथे आला. दोघांनी योगेशला मारहाण सुरू केली.

याचदरम्यान शिवानी, सरिता व अन्यही तिथे आले. त्यांनी योगेश व त्याच्या दोन मित्रांना मारहाण केली. याबाबत कळताच योगेशचा भाऊ लोकेशही तेथे पोहोचला. सहा जणांनी चौघांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शुभमला याबाबत कळताच तो घरी गेला. त्याने घरून चाकू आणला. त्याने योगेश व लोकेशवर चाकूने वार केले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. मारेकरी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी चौघांना मेयो हॉस्पिटीलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून योगेशला मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचे अटकसत्र सुरू केले आहे.

Maharashtra TimesNagpur News : खेळता खेळता 11 वर्षीय मल्हारसोबत नेमकं काय घडलं? बंद खोलीचं दार उघडताच कुटुंबीयांना जबर धक्का
तीन दिवसांपूर्वीच उपायुक्तांचा ‘दम’, तरीही…
तीन दिवसांपूर्वी पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांनी परिमंडळ पाचमधील १३४ गुन्हेगारांची परेड घेत त्यांना सज्जड दम दिला होता. यावेळी योगेशही तेथे होता. ‘कोणताही वाद झाला तर थेट पोलिस ठाण्यात तक्रार करा, कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल’, असेही उपायुक्तांनी त्यांना बजावले होते. उपायुक्तांनी दम दिल्यानंतरही अवघ्या तीनच दिवसांत हत्येची घटना घडली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत