Headlines

हार्बर रेल्वे मार्गावर ‘एसी लोकल’च्या फेऱ्या वाढल्या! पनवेल-सीएसएमटी नवे वेळापत्रक; सामान्य लोकलवर काय परिणाम?| Maharashtra Times


Harbour Line AC Local: हार्बर लाइनवर 1 मेपासूव 14 वातानुकूलित लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्या आहेत. उन्हाळी हंगामात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देणे, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

हार्बर एसी लोकल
म. टा. वृत्तसेवा, पनवेल: हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये १ मेपासून बदल करण्यात आला आहे. नवीन बदलांनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड, वाशी आणि पनवेल स्थानकांदरम्यान धावणाऱ्या एसी गाड्यांच्या वेळेत महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत.

ज्या गाड्यांच्या क्रमांकासमोर ‘X’ असे चिन्ह देण्यात आले आहे, त्या गाड्या रविवार आणि नामनिर्देशित सुट्ट्यांच्या दिवशी धावणार नाहीत. विशेष म्हणजे, सुट्ट्यांच्या दिवशी चालणाऱ्या सर्व एसी लोकलच्या नियोजित फेऱ्या या साध्या गाड्या असतील. ज्यामुळे प्रवाशांना नियमित सेवा मिळत राहील.

कसं असेल नवं वेळापत्रक?

सकाळी वडाळा रोडवरून पहिली एसी लोकल ०५:०६ वाजता सुटेल आणि ०६:०८ वाजता पनवेलला पोहोचेल. सीएसएमटी सकाळी ०७:१७, ०७:४०, १०:१० आणि १०:३४ वाजता पनवेलसाठी गाड्या उपलब्ध असतील दुपारी १.०७ वाजता सीएसएमटीवरून सुटणारी गाडी वाशीपर्यंत धावेल. संध्याकाळी ३:३६, ०६:३३ आणि ८:०० वाजता पनवेलसाठी मुख्य फेऱ्या असून, रात्रीची शेवटची एसी लोकल मध्यरात्री १२:२४ वाजता सुटून ०१:१३ वाजता वाशीला पोहोचेल.

पनवेल येथून मुंबईकडे जाण्यासाठी पहिली एसी लोकल सकाळी ०६:१७वाजता असेल (रविवार वगळून). त्यानंतर सकाळी ०८:४५, ११:४३ आणि दुपारी २:३१ वाजता पनवेलवरून सीएसएमटीसाठी गाड्या सुटतील. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ५:०७, ६:३७ आणि ८:०७ वाजता पनवेलहून प्रवाशांना एसी लोकलची सुविधा मिळेल. दिवसाची शेवटची परतीची गाडी रात्री १०:५८ वाजता पनवेलहन स्ट्रन मध्यरात्री १२:१७वाजता ला पोहोचेल.

एसी लोकल फेऱ्या वाढवल्या

दरम्यान, मुंबईत 1 मेपासून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर 14 एसी लोकल फेऱ्या वाढवणार असून यामुळे पहिल्यांदाच एसी लोकलची संख्या 100च्या वर गेली आहे. मुख्य मार्गावर सध्या एसी लोकलच्या दिवसभर 80 फेऱ्या असतात. हार्बरवर आता हा आकडा 28 वर पोहोचला असून एकूण फेऱ्यांची संख्या 108 इतकी झाली आहे. यामुळे मुंबईसह नवी मुंबईतील वाशी, बेलापूर, पनवेलमधील प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार आहे.

परंतु. सामान्य लोकल ट्रेनऐवजी या एसी लोकल फेऱ्या चालवल्या जाणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या सामान्य लोकलपेक्षा कैकपटीने कमी असते. त्यामुळे पीक अव्हरदरम्यान या लोकलमुळे इतर नागरिकांचा खोळंबा होतो. पनवेल स्थानकावरून सकाळी 9च्या दरम्यान सुटणारी एसी लोकल नेहमी विलंबाने सुटते अशा प्रवाशांचा तक्रारी आहेत. त्यामुळे पुढील लोकलचं वेळापत्रक कोलमडतं आणि ट्रेन, रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढते.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा