Chhatrapati Sambhajinagar Crime: उच्चशिक्षित तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
२७ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने टेकडीवर जाऊन मृत्यूला कवटाळलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शहरातील गोगाबाबा टेकडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरात खाजगी शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या एका २७ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने डोंगरावर लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ट्रेकिंगसाठी गेलेल्या नागरिकांमुळे हा प्रकार समोर आला. पोलीस कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकाने स्वतः दोन किलोमीटरची कठीण चढण पार केली आणि मृतदेह स्ट्रेचरवर ठेवून अत्यंत काळजीपूर्वक पायथ्याशी खाली उतरवला.
रेणुका शांताराम गांगुर्डे (वय २७, मूळ रा. शिवारे, ता. चांदवड, जि. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. ती शहरात एम.पी.एड.चे शिक्षण पूर्ण करून शारदा मंदिर कन्या प्रशालेत सहाय्यक शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. दरम्यान रेणुका ही मूळची नाशिक जिल्ह्यातील असून तिचे आई-वडील आणि भाऊ गावातच मोलमजुरी करतात. ती ३ वर्षांपूर्वी शिक्षणासाठी संभाजीनगरात आली होती. अत्यंत गरिबीतून शिक्षण पूर्ण करून ती शिक्षिका झाली होती. सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काही नागरिक नेहमीप्रमाणे गोगाबाबा डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एका झाडाला तरुणीने गळफास घेतल्याचे धक्कादायक दृष्य दिसले. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला. माहिती मिळताच बेगमपुरा आणि छावणी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी धावले. मृतदेह उंच डोंगरावर उच्च ठिकाणी असल्याने तिथे रुग्णवाहिका जाणे अशक्य होते. त्यामुळे पोलिसांनी रुग्णवाहिका डोंगराच्या पायथ्याशी उभी केली. पोलीस कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकाने स्वतः दोन किलोमीटरची कठीण चढण पार केली आणि मृतदेह स्ट्रेचरवर ठेवून अत्यंत काळजीपूर्वक पायथ्याशी खाली उतरवला.
ओळखपत्रावरून लागला सुगावा; घाटीत नातेवाईकांचा टाहो
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, रेणुका हिच्या बॅगमध्ये तिचे पॅन कार्ड, शाळेचे ओळखपत्र आणि मोबाईल फोन मिळून आला. यावरून तिची ओळख पटली. मुलीच्या मृत्यूची बातमी मिळताच नाशिकहून धावून आलेल्या तिच्या आई-वडिलांनी घाटी रुग्णालयात फोडलेला टाहो उपस्थितांचे डोळे पाणावून गेला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून शिक्षिका बनलेल्या रेणुकाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? तिच्या आत्महत्येचे गूढ काय? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. ई. यादव करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा