Headlines

Ketan Agarwal Case Siya Goyal And Chetan Chaudhari Lawyer Vipul Dushyam Big Claim in Court


केतन अगरवाल मृत्यू प्रकरणी आज न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. पोलिसांनी यावेळी आरोपींच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने यावेळी सात दिवसांऐवजी 5 दिवसांच्या कोठडीची मागणी मान्य केली.

Pune News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, लोणावळा : केतन अगरवाल मृत्यू प्रकरणी वडगाव मावळ सत्र न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कोणकोणत्या गोष्टींचा तपास करायचा आहे, याबाबत न्यायालयात सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे सियाच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. केवळ आरोपांच्या आधारावर ही हत्या आहे, असं म्हणता येणार नाही, असं सियाच्या वकिलांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यास पोलिसांनी अटक केली. त्यांना देण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना वडगाव मावळ सत्र न्यायालयात सोमवारी दुपारी तीन वाजता हजर करण्यात आलं होतं.

आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणी, आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना तपास पूर्ण झाल्याने अधिकच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे म्हटले. तर, केतन अग्रवाल कुटुंबीयांच्या वतीने आणि सरकारी वकिलांनी तपासातील काही शिल्लक बाबींच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद करत पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना आणखी पाच दिवसांची (३ जुलै पर्यंत) कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी नेमका युक्तिवाद काय केला?

“आरोपींनी कट रचला असल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र गुन्हा कसा केला याचा तपास करायचा आहे. कट कुठं बसून केला हे तपासायचे आहे. सियाप्रमाणे चेतनला घेऊन रिक्रियेशन करायचं आहे. लोहगडावर अनेकांशी संवाद साधला आहे, बालीला प्री वेडिंग शूटला जायचं नव्हतं म्हणून, पासपोर्ट फाडले, तो केतनचा पासपोर्ट शोधायचे आहे”, असं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं.

“लोहगडावर जाऊन रेकी केली का? हे तपासायचे आहे? या कटात कोणी सहभागी आहे का? केतनचा मोबाईल काही वेळाने देण्यात आला, त्यातील माहिती रिकव्हर करायची आहे, त्यांनी माहिती लपवली आहे, ती मिळवायची आहे. तसेच, ते हस्तगत करायचे आहेत, त्यामुळे आरोपींना सात दिवसांनी पोलीस कोठडी मिळावी”, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

सियाच्या वकिलांचा पोलीस कोठडीला विरोध

दरम्यान, “आरोपींना केलेली अटक कायद्याला धरुन आहे का?, आमचा अर्ज दाखल करून घ्या”, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी सुरुवातील न्यायालयात केली. “या प्रकरणी तांत्रिक तपास, चौकशी, नाट्य रूपांतर झालं. आता पुढचा तपास तांत्रिक आहे, मग पोलीस कोठडीची गरज वाटत नाही”, असा युक्तिवाद सियाच्या वकिलांनी केला होता.

“नाट्य रूपांतर करायची मागणी केली जातीये, हे आपल्या देशात झालेलं नाही. दरीत पडून मृत्यू झालाय, पण इथं हत्या झाली म्हटलं जातंय. आई-वडील म्हणतायेत म्हणून याला हत्या म्हणता येणार नाही. हा गुन्हा बेलेबल आहे? त्यामुळे पोलीस कोठडी देऊ नये”, असेही सियाचे वकील विपुल दुष्यम यांनी म्हटले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा