Headlines

Nanded Legislative Council Election Pratap Patil Chikhlikar Withdraws Son Election Application Form; कधीकाळी कट्टर विरोधक, आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर बॅकफूटवर, पुत्रप्रेम बाजूला; प्रताप पाटील चिखलीकरांची अशोक चव्हाणांना साथ


Nanded Legislative Council Election : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार संघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याचदरम्यान, नांदेडमध्ये एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

Nanded Legislative Council Election
प्रवीण पाटील चिखलीकर निवडणुकीत माघार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. याची प्रचिती पुन्हा एकदा नांदेडच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार प्रताप पाटील चिखलीकर विधान परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने दोन वर्षानंतर पुन्हा एकत्र आले आहेत. एवढचं नाही तर पुत्र प्रेम बाजूला ठेवून महायुतीचे उमेदवार अमर राजुरकर यांची साथ देखील चिखलीकर देणार आहे. तेव्हा राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. दरम्यान, दोन मात्तबर नेत्यांमध्ये झालेली दिलजमाई राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही नेते एकत्र राहणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर बॅकफूटवर

राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सूरु असून महायुती एकत्रित निवडणूक लढत आहे. नांदेडमध्ये मात्र वेगळं चित्र पहायला मिळालं. भाजपकडून अमर राजुकरकर यांनी उमेदवारी दाखल केली तरी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी देखील उमेदवारी दाखल केली होती. सुपुत्राच्या उमेदवारीवरून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांची धाकधूक वाढवली. शिवसेनेच्या माध्यमातून चिखलीकर हे मोठी खेळी करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती, संख्याबळाची आकडेमोड सुरु होती, मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर चिखलीकरांनी एक पाऊल मागे टाकत आपल्या मुलाला अर्ज माघार घेण्यास लावलं आहे. शिवाय भाजपचे उमेदवार अमर राजूरकर यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra TimesMLC Election: विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार? ‘औपचारिक लढतीत अर्थ नाही’, शेवटच्या क्षणी बावनकुळेंचं काँग्रेसला महत्त्वाचं आवाहन!

दोन वर्षानंतर चव्हाण-चिखलीकर पुन्हा एकत्र

भाजप खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात पुन्हा एकदा दिलजमाई झाली आहे. राजकारणातील दोन्ही नेते एकमेकांचे विरोधक मानले जातात. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा चिखलीकर हे भाजपकडून लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उभे होते, दुर्देवाने त्यांचा पराभव झाला. पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केला. या दरम्यान त्यांच्यात मोठे वितुष्ठपणा निर्माण झालं आणि ‘अशोक चव्हाणांमुळे माझा पराभव झाला’, असा थेट आरोप त्यांनी केला. नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकीतही दोन्ही नेत्यांमध्ये शितयुद्ध पाहायला मिळालं. दोघांनी टीकेची एकही संधी सोडली नाही. आता दोन वर्षानंतर विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांची दिलजमाई झाली आहे, तेव्हा राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा ठरत आहे. विशेष बाब म्हणजे, आज संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन एकत्र आल्याची त्यांनी घोषणा केली. अशोक चव्हाण यांनी चिखलीकर यांच्या घरी तब्बल दोन वर्षानंतर भेट दिली आहे.
Maharashtra TimesVikram Kakade : विक्रम संजय काकडेंची मालमत्ता 150 करोड, दुबईत आलिशान फ्लॅट, जय पवारांना 10 कोटींचं कर्ज दिल्याचं उघड

संख्याबळानुसार महायुती भक्कम

नांदेडमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकूण 452 नगरसेवक मतदार आहेत. एकंदरीत आकडेमोड पाहता महायुतीतील भाजपकडे 138, राष्ट्रवादीकडे 84, शिवसेना शिंदे गट 23, मराठवाडा जनहित पार्टीचे 39 असे एकूण 284 एवढी संख्या आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे 92, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 13, शिवसेना ठाकरे गट 19 आणि वंचित बहुजन आघाडी 6 असे 130 एवढी संख्याबळ आहे. शिवाय एमआयएम पक्षाचे 20 तर 14 अपक्ष मतदार आहेत. तेव्हा महायुतीची बाजू भक्कम दिसत आहे. दुसरीकडे भाजप आणि इतर पक्षातील नाराज मतदार आमच्यासोबत असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. एमआयएम पक्ष कोणाला मतदार करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमर राजूरकर यांना उमेदवारी, चिखलीकर सोबतीला? अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा