Headlines

wada company three workers died on the spot in ac explosion incident ; एसीच्या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू; वाडा तालुक्यातील कंपनीत दुरुस्तीवेळी घटना


Palghar News: वाडा तालुक्यातील एका कंपनीत एसीच्या झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

wada accident
एसीच्या स्फोटात तीन कामगार ठार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, वाडा: वाडा तालुक्यातील अबिटघर (अभाणपाडा) गावात एका कंपनीच्या वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आलेल्या तीन कामगारांचा याच यंत्रणेच्या स्फोटात मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने कारखान्यातील बेपर्वाई पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

अबिटघर (अभाणपाडा) गावातील विस्तार मेटल नावाची कंपनी तब्बल आठ वर्षानंतर जानेवारीपासून पुन्हा नव्याने सुरू झाली. शुक्रवारी कंपनीतील वातानुकूलन यंत्रणेत काही बिघाड झाल्याने, बाहेरून आलेले काही कामगार दुरुस्ती करत होते. त्यावेळी, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला. यात मोहम्मद अली अन्सारी (३२, कुर्ला), अखिलेश कुमार मोतीलाल जैस्वाल (४५, उत्तर प्रदेश ) आणि किसन भिवा निकम (५५, शीव) या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

Maharashtra TimesAshish Meshram : चार मुलांच्या आईकडे लैंगिक सुखाची मागणी, नकार दिल्याने जीव घेतला, टीव्ही अभिनेता आशिष मेश्रामला अटक
‘आम्ही वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कंत्राट दिले होते. यात आमचा दोष असण्याचे कारण नाही. कंपनीतील सर्व कामगारांना आम्ही सुरक्षा यंत्रणा देतो. मात्र ते वापर करीत नाहीत,’ असे सांगत कंपनीचे व्यवस्थापक दिनेश मित्तल यांनी जबाबदारी झटकली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली असून कारखाना निरीक्षकांचा तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे वाडा पोलिसांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesGadchiroli Accident: आनंदावर क्षणात दु:खाचा डोंगर! लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; 5 ठार, 12 गंभीर जखमी
कारखाने की मृत्यूचे सापळे?
वाडा तालुक्यात मोठे औद्योगिक क्षेत्र असून अनेक कारखाने आहेत. त्यांच्यावर कुणाचेही बंधन नसल्याने अनेक विनाशकारी कारखाने प्रदूषण ओकत असून, कारखान्यांत अपघातांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचे धिंडवडे उडाले आहेत. या पार्श्वभूमीवर, अबिटघर येथील प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा