Gokul Election Mahayuti Pannel: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीने ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ स्थापन करत एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सतेज पाटील यांच्या आघाडीविरोधात थेट सामना रंगणार असून कोल्हापूरच्या राजकारणात निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
साईप्रसाद मेहेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ (गोकुळ) च्या पंचवार्षिक संचालक निवडणुकीसाठी महायुतीही अखेर मैदानात उतरली आहे. महायुतीने एकत्र येऊन ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ या पॅनलच्या नावाखाली लढण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रेसिडेन्सी क्लबमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेतला गेला, असे उपस्थित नेत्यांनी सांगितले.
पंचवार्षिक धोरण
कोल्हापुरात पार पडलेल्या या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य पक्षाचे संस्थापक तथा आमदार डॉ. विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि जनसुराज्य पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम आदी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी या बैठकीत गोकुळच्या पुढील पाच वर्षांसाठी एकत्रित धोरण आखण्यावर विस्तृत चर्चा केली.
“कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या..”
माजी मंत्री तथा आमदार डॉ. विनय कोरे यांनी स्पष्ट केले की, “आधी काही कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे एकात्मतेबाबत शंका निर्माण झाली होती; परंतु आता सर्व शंका दूर झाल्या आहेत. त्यामुळे महायुती एकत्र येऊन आम्ही गोकुळची निवडणूक लढणार आहे.” 25 मे रोजी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी 2026–31 या काळासाठीच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा केली होती; या निवडणुकीत 25 संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे.
सध्या राजकीय दृष्टीनेही या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. कारण, महायुतीच्या एकत्रित उतरण्याने महाविकास आघाडीचे नेते तथा काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आ. सतेज पाटील यांच्या ‘राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ पॅनलशी थेट सामना होणार आहे. महायुतीने सांगितले की, ‘गोकुळमधून दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदे आणि विकासपर योजनांचे आश्वासन देण्यात येणार आहे. लवकरच उमेदवार निवड प्रक्रियेची सुरूवात होणार असल्याने जिल्हा पातळीवर निवडणुकीला अधिक रंग चढणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा