Europe Heatwave: तापमानात झालेली वाढ, त्यामुळे वाढलेला उकाडा लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे. त्यातच सायलेंट किलर लोकांच्या जीवावर उठला आहे. आतापर्यंत १३०० हून अधिक जणांचा जीव गेला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पॅरिस: युरोपमधील २६ देशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. युरोपमध्ये यंदा रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. नैऋत्य युरोपातून सुरू झालेल्या उष्माची झळ आता पूर्व युरोपला बसू लागली आहे. फ्रान्स , इटली, स्पेन, पोलंड, झेक प्रजासत्ताक आणि लिथुआनिया यांच्यासह अनेक देशांमध्ये पारा ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. उष्माघातानं युरोपात आतापर्यंत कमीत कमी १३०० जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या फ्रान्समध्ये हा आकडा १००० पेक्षा अधिक जास्त आहे. हा आकडा वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे.
फ्रान्समध्ये उष्णतेची समस्या सर्वाधिक तीव्र आहे. फ्रान्सची सार्वजनिक आरोग्य संस्था सेंट पब्लिक फ्रान्सनं रविवारी २४ जूननंतर देशात जवळपास १ हजारहून अधिक मृत्यूंची नोंद केली आहे. गेल्या आठवड्यातील ३ दिवसांत उष्मा प्रचंड वाढला. तेव्हा प्रामुख्यानं अनेकांचा मृत्यू झाला. मृतांमधील ८५ टक्के जणांचं वय ६५ वर्षांहून अधिक आहे. पॅरिस आणि इले-डी-फ्रान्स परिसरांना सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे घरात होणाऱ्या मृत्यूंचा आकडा ४० टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच लोक रुग्णालयात पोहोचू शकले नाहीत. त्यांचा घरातच मृत्यू झाला.
फ्रान्सच्या आरोग्य यंत्रणेनं धोक्याचा इशारा देत मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली आहे. रुग्णालय, नर्सिंग होम्स आणि घरांमध्ये होणाऱ्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी फ्रान्समध्ये अनेकांनी नदी, तलाव आणि जलाशयांचा आधार घेतला. या जलस्रोतांमध्ये बुडून मरण पावलेल्यांची संख्या ७४ इतकी आहे.
फ्रान्सचं सरासरी तापमान २९.८ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. १९४७ पासून देशात तापमान मोजण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून पहिल्यांदाच इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. फ्रान्सचे ४४ कोटी लोक (देशाची जवळपास संपूर्ण लोकसंख्या) भीषण उकाड्याचा सामना करत आहेत.
जागतिक आरोग्य संघटेनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन २१ जूननंतर संपूर्ण युरोपात १३०० पेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती दिली. हिट स्ट्रेसला बऱ्याचदा सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण हा गुपचूप जीव घेतो, असं टेड्रोस यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. Gaza Israel Conflict: गाझात 20 हजार मुलांना संपवलं; सैनिकांनी ‘गेम’ खेळून पोरांना अपंग केलं; इस्रायलचा क्रूर चेहरा उकाडा वाढला, एसीसाठी हाणामारी भीषण उकाड्यामुळे फ्रान्स, इटलीसह अनेक युरोपीय देशांमध्ये एसी, कूलर आणि पंख्यांची मागणी वाढली आहे. युरोपातील बहुतांश घरं भीषण सहन करण्याच्या दृष्टीनं उभारण्यात आलेली नाहीत. ऍमेझॉनसारख्या वेबसाईट्सवर एसी, पंख्यांची मागणी वाढली आहे. टेक्निशियन्सकडे इन्स्टॉलेशन्ससाठी बऱ्याच ऑर्डर येत आहेत. त्या पूर्ण अवघड होऊ लागलं आहे. मॉल्स, दुकानांमधील परिस्थिती अक्षरश: हाताबाहेर गेली आहे. एसी, पंखे घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा