Headlines

cctv captures horrific assault on 4 yrs old child due to clash with father at vasai ; वडिलांचा राग पोरावर काढला; 4 वर्षीय चिमुकल्याला अमानुष मारहाण, वसईतील संतापजनक प्रकार


Vasai Crime: वडिलांसोबतच्या जुन्या वादाचा राग काढून सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने ४ वर्षीय मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

vasai crime
वसईत चार वर्षीय मुलाला मारहाण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, वसई : वसईतील चार वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या मुलाच्या वडिलांसोबत असलेल्या जुन्या वादातून सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी वसई पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.

विघ्नेश कोंढरे (४) असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव असून तो आपल्या कुटुंबासह वसई गाव येथील अनुपम घरसंकुल सोसायटीमध्ये राहतो. त्याचे वडील अतुल कोंढरे यांचा त्याच सोसायटीत राहणाऱ्या रिक्षाचालक संदीप पवार याच्या सोबत वाद होता. त्याचा राग संदीपच्या मनात होता. सोमवारी सायंकाळी सोसायटीच्या आवारात मुले खेळत होती. त्यांच्या सोबत विघ्नेशही खेळत होता.

Maharashtra TimesPalghar News: एसीच्या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू; वाडा तालुक्यातील कंपनीत दुरुस्तीवेळी घटना
मात्र अचानक त्या ठिकाणी संदीप पवार आला आणि त्याने विघ्नेश सोबत खेळणाऱ्या मुलांना बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर विघ्नेशला दोन्ही पायांना पकडून डोक्यावर आपटले. तसेच एवढ्यावरच न थांबता अमानुष मारहाण केली. यावेळी मुलाची आजी मध्ये पडली असता तिलाही मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला असून या घटनेचा वसईकरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra TimesAshish Meshram : चार मुलांच्या आईकडे लैंगिक सुखाची मागणी, नकार दिल्याने जीव घेतला, टीव्ही अभिनेता आशिष मेश्रामला अटक
या मारहाणीत विघ्नेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरा रोड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सोसायटीमध्ये राहणाऱ्यांनी सांगितले . या प्रकरणी वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी संदीप पवार याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा