Headlines

ketan agarawal murder case jupiter scooter evidence seize by police chetan choudhary; सिया-चेतनने पार ‘दृश्यम’ सारखं डोकं लावलं, पण पोलिसांनीही चेकमेट केलंच, केसमधील निर्णायक पुरावा जप्त


Ketan agrawal murder jupiter scooter seized: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी चेतन चौधरीने वापरलेली ज्युपिटर ही दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. टोलनाका टाळण्याचा प्लॅन आणि CCTVमधून उघड झालेला तपासाचा महत्त्वाचा धागा या सगळ्या घडामोडींनी आरोपींचे खेळ उलगडत आहेत.

ketan agarawal murder case jupiter scooter evidence
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे. आरोपी चेतन चौधरीने गुन्हा घडवून आणण्यासाठी वापरलेली ज्युपिटर दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. पुण्याहून लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आणि त्यानंतर परतण्यासाठी याच दुचाकीचा वापर झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या वाहनाकडे आता पोलिसांकडून या गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावा म्हणून पाहिले जात आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हा कट आधीच बारकाईने आखला होता. चारचाकी वाहन वापरल्यास सोमाटणे फाटा आणि उर्से टोलनाक्यांवरील कॅमेऱ्यांमध्ये स्कूटर दिसली असती आणि पोलिसांना तपासाची दिशा सहज मिळाली असती. ही शक्यता लक्षात घेऊन चेतनने चारचाकीऐवजी ज्युपिटर दुचाकीवरून लोहगड गाठण्याचा निर्णय घेतल्याचे तपासातून समोर आले आहे.

याच दुचाकीवर आधीही कारवाई झालेली

पोलिसांनी जप्त केलेल्या एमएच १२ बीडब्ल्यू १२४७ क्रमांकाच्या ज्युपिटर दुचाकीबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्याच्या काही काळाआधी पुणे वाहतूक पोलिसांनी मोबाईलवर बोलत वाहन चालवल्याप्रकरणी चेतनवर एक हजार रुपयांचा ऑनलाइन दंड ठोठावला होता. मात्र हा दंड त्याने भरला नव्हता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

सीसीटीव्हीमुळे उधळला आरोपींचा डाव

तपासानुसार, ठरलेल्या कटानुसार चेतन ज्युपिटरवरून लोहगडावर पोहोचला. तिथे त्याने सियासोबत मिळून केतन अग्रवालला खोल दरीत ढकलून दिले. त्यानंतर तो त्याच दुचाकीवरून पुण्याकडे परतला. टोलनाक्यांवरील नोंद टाळण्यात आरोपींना यश आले असले, तरी लोहगड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी त्यांचा संपूर्ण डाव उधळून लावला आहे.

Maharashtra TimesPune Crime : केतनला संपवणं ही तर फक्त सुरुवात होती, सियाचा पुढचा प्लॅन चेतनसाठी होता, 1 कोटी रुपयांच्या ट्वीस्टने प्रकरणाला नवं वळण

फुटेजमध्ये चेतन, सिया आणि ही दुचाकी स्पष्टपणे दिसून आली आहे. याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची साखळी जोडत संपूर्ण कटाचा उलगडा केला आहे. दरम्यान, पोलिसांनी विशेष शोधमोहीम राबवून ही ज्युपिटर दुचाकी ताब्यात घेतली आहे. तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा